Woman Assault Pudhari
जालना

Jalna Crime : महाविद्यालयीन विद्यार्थ्याकडून तरुणीवर अत्याचार

जालना शहरात धक्कादायक घटना : गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

जालना : शहरातील मिलत नगर परिसरात राहणाऱ्या एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याकडून सहाध्यायी तरुणीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणामुळे शहरात एकच खळबळ उडाली असून कदीम जालना पोलीस ठाण्यात संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुस्लिम विध्यार्थी व पीडित तरुणी एकाच महाविद्यालयात शिक्षण घेत होते. ओळखीचा फायदा घेत आरोपीने तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. तसेच, आरोपीने संबंधित तरुणीला वेळोवेळी बुरखा घालण्यास भाग पाडून तिच्यासोबत फिरविल्याचाही आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या प्रकरणातील सर्व बाबींची सखोल चौकशी केली जात असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.आरोपीस न्यायालयासमोर उभे केले असता त्यास 20 पर्यंत पोलीस कोठोडी देण्यात आली आहे.

दरम्यान, नाशिक आणि परतवाडा येथील घटनांनंतर जालना शहरात अशा प्रकारची घटना घडल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. पोलीस प्रशासनाने या प्रकरणात कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले असून पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT