मुलाने कुत्र्याच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेत तिथून पळ काढला Pudhari
जालना

Shahagad Dog Attack | शहागड येथील अकरा वर्षांच्या मुलावर कुत्र्याचा हल्ला; गालाचा घेतला चावा

थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद : मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

Child Injured Dog Bite Jalna

शहागड : अंबड तालुक्यातील शहागड येथे सोमवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घरासमोर खेळत असलेला मोहम्मद अली मुकद्दीर शेख (वय 11) हा घरासमोर खेळत असताना या चिमुकल्यावर मोकाट कुत्र्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या मोकाट कुत्र्याने अचानक त्याच्यावर झडप घातली. कुत्र्याने चिमुकल्याच्या गालाला चावा घेतला. यावेळी मुलाने कुत्र्याच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेत तिथून पळ काढला.

दरम्यान, स्थानिक नागरिकांनी धाव घेत त्या कुत्र्याला तेथून हुसकावून लावले. या हल्ल्यात चिमुकला गंभीर जखमी झाल्याने त्याला तातडीने उपचारासाठी खासगी वाहनाने छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय घाटी दवाखान्यात हलवण्यात आले‌. सध्या गंभीर जखमी चिमुकल्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून चिमुकल्यावर लसीकरण करण्यात येत आहे. त्यानंतर सर्जरी केली जाणार आहे. ही घटना वाऱ्यासारखी शहागड परिसरात पसरल्यानंतर पालकांमध्ये चिंतेचे वातावरण असून भयभीत झालेले आहेत.

ही घटना थरकाप उडवणारी असून या घटनेनंतर शहागड परिसरातील मोकाट कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मोकाट कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थ आणि नागरिकांकडून करण्यात येत आहे. तत्काळ या कुत्र्यांचा बंदोबस्त करा अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा विभाग प्रमुख राजेश राऊत यांनी दिलेला आहे.

शहागड तील हनुमान मंदिर, मरकस मज्जिद, ग्रामपंचायत जवळील पाळीव मोकाट कुत्र्याचा हौदस असून येणारा जाणारा दुचाकी चोरास लहान मुलांना ते चावा घेत आहेत. काही दिवसापूर्वीच लक्ष्मण धोत्रे, कृष्णा धोत्रे, सचिन गायकवाड यांचा मुला-मुलींना कुत्र्याने चावा घेतला होता. तसेच या आठवड्यातील ही आठवी घटना असून तत्काळ ग्रामपंचायत आणि पाळीव व मोकाट कुत्र्यांना लसीकरण करून, हे कुत्रे तत्काळ पकडून म्हैसाळा अभयारण्यात सोडण्याची मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT