Sand Mafia Action (File Photo)
जालना

Jalna News | शहागड, वाळकेश्र्वरच्या तीन वाळू माफिया विरूद्ध कारवाई

Shahagad Sand Mafia | माफिया पळाले; लोकेशन पंटरची बुलेट पकडली

पुढारी वृत्तसेवा
अकबर शेख

Sand Mafia Action

शहागड : वाळकेश्र्वर (ता.अंबड) येथील गोदावरी नदीच्या पात्रातून शहागडचे दोन, वाळकेश्र्वरचा एक असे तीन वाळू माफिया उत्खनन व वाहतूक करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर यांना मिळाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर, जमादार रामदास केंद्रे, चालक साठे, हवाळे, काळे आदींच्या पथकाने गोदावरी नदीच्या पात्रात जाऊन छापा टाकला असता, वाळू माफिया संजय सुभाष उंबरे, गणेश शांतीलाल उंबरे, (दोन्ही रा. शहागड), आकाश मधुकर येटाळे रा. वाळकेश्र्वर तीनही वाळू काढणारे केणीच्या ट्रॅक्टरसह पळून गेले.

दरम्यान पोलिसांचे लोकेशन ठेवणारा पंटर ची बुलेट एम.एच.१२.आर.एच.५५४२ दोन लाख रुपये किंमतीची दुचाकी मात्र पोलिसांनी जप्त केली.

तीनही अवैध वाळू माफिया विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास जमादार रामदास केंद्रे करत आहेत. या कार्यवाहीने लोकेशन पंटरसह वाळू तस्कंराचे धाबे दणाणलेले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT