Jalna accident 
जालना

Jalna accident: रोहिलागड फाट्यावर भीषण अपघात; STच्या धडकेत दुचाकीवरील महिला जागीच ठार

Maharashtra accident news: अपघाताची माहिती मिळताच पाचोड पोलिस ठाण्याचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले

पुढारी वृत्तसेवा

जामखेड: अंबड तालुक्यातील रोहिलागड फाट्याजवळ धुळे–सोलापूर महामार्गावर रविवारी (दि. २६ ऑक्टोबर) दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास दुचाकी आणि ST मध्ये धडकून झालेल्या भीषण अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूरहून धुळ्याकडे जाणाऱ्या (क्र. MH०९ EX ९६५८) बसने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील महिला कमल शामराव देवघरे (वय ५५, रा. वरखडी, ता. वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) या रस्त्यावर पडून बसखाली सापडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. मृत महिला आपल्या नातवंडासह प्रवास करत होत्या.

पोलिसांकडून कारवाई

अपघाताची माहिती मिळताच पाचोड पोलिस ठाण्याचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली. मृतदेह पुढील तपासणीसाठी (शवविच्छेदनासाठी) ग्रामीण रुग्णालय पाचोड येथे पाठवण्यात आला असून, पाचोड पोलिस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT