Jalna News : १९ वर्षांनंतर शाळेच्या आठवणींना उजाळा file photo
जालना

Jalna News : १९ वर्षांनंतर शाळेच्या आठवणींना उजाळा

सन २००७-०८ या शैक्षणिक वर्षातील इयत्ता दहावीच्या माजी विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला मोठ्या उत्साहाने उपस्थिती लावली.

पुढारी वृत्तसेवा

Jalna Reliving school memories after 19 years

जाफराबाद, पुढारी वृत्तसेवाः श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, भारज येथे माजी विद्यार्थ्यांचा गेट-टुगेदर अर्थात स्नेहमिलन सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण आणि आनंददायी वातावरणात संपन्न झाला. सन २००७-०८ या शैक्षणिक वर्षातील इयत्ता दहावीच्या माजी विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला मोठ्या उत्साहाने उपस्थिती लावली.

तब्बल १९ वर्षांनंतर एकाच छताखाली एकत्र आलेल्या मित्र-मैत्रिणींनी शालेय जीवनातील जुन्या आठवणींना उजाळा दिला. शाळेतील गमतीजमती, शिक्षकांचे मार्गदर्शन, वर्गातील किस्से आणि बालपणीच्या आठवणींमध्ये सर्वजण रमून गेले. यावेळी प्रत्येक विद्यार्थ्याने आपला परिचय करून देत सध्याच्या जीवनातील वाटचालीची माहिती एकमेकांना दिली. अनेक वर्षांनंतर झालेल्या या भेटीमुळे सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह ओसंडून वाहत होता.

या स्नेहमिलन सोहळ्याला सामाजिक बांधिलकीची जोड देत उपस्थित सर्व माजी विद्यार्थ्यांनी अवयवदानाची सामूहिक शपथ घेतली. अवयवदानाबाबत जनजागृती व्हावी आणि मृत्यूनंतरही आपल्या अवयवांच्या माध्यमातून गरजू व्यक्तींना नवजीवन मिळावे, या उदात्त हेतूने सर्वांनी या सामाजिक उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. मैत्रीच्या नात्याबरोबरच समाजाप्रती असलेली जबाबदारी जपण्याचा एक प्रेरणादायी संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक एम. जे. लुटे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून सपकाळ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्विठोबा बेराड व अरुण पायघन यांनी केले, तर अक्षय दामधर यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी विद्यालयातील शिक्षकवृंद सपकाळ सर, जैस्वाल, बोर्डे सर, काटे सर, श्रीमती क्षीरसागर मॅडम, घोडके मॅडम व कुलकर्णी मॅडम यांची विशेष उपस्थिती होती.

अवयवदानाच्या शपथेतून सामाजिक बांधिलकी

खरंच, काळ बदलला, वर्षे सरली, प्रत्येकाची वाट वेगळी झाली; मात्र शाळेच्या आठवणी आणि मैत्रीचे बंध आजही तितकेच घट्ट आहेत. अवयवदानाच्या शपथेतून माणुसकीचा आणि सामाजिक बांधिलकीचा संदेशही या स्नेहमिलन सोहळ्याने दिला. जुन्या मित्र-मैत्रिणींची भेट, शिक्षकांचे मार्गदर्शन, आणि शालेय जीवनातील आठवींनी हा स्नेहमिलन सोहळा अविस्मरणीय ठरला. शाळेच्या आठवर्णीमध्ये रमण्याची संधी मिळाल्याने माजी विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT