बसस्टँड रोडवरील वेश्याव्यवसायावर छापा File Photo
जालना

Jalna Crime : बसस्टँड रोडवरील वेश्याव्यवसायावर छापा

13 पीडित महिलांची सुटका; 7 आरोपी जेरबंद

पुढारी वृत्तसेवा

जालना : बसस्टँड रोडवरील वैष्णवी लॉज व मोक्ष लॉज येथे सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर पोलिसांनी छापा मारत 7 पुरुष आरोपींना अटक केली असून 13 पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे.

ही कारवाई शुक्रवार, दि. 20 रोजी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने केली. या कारवाईत मोक्ष लॉजचा मालक सचिन नंदू पवार (30, रा. वाटूर, ता. परतूर, जि. जालना), मॅनेजर संतोष भोलेनाथ जाधव (रा. खडपुरी, ता. जालना) तसेच वैष्णवी लॉजचा मॅनेजर कैलास रतनकुमार (30, रा. सावा, ता. चित्तोडगड, राज्य राजस्थान) यांच्यासह पंकज भाऊसाहेब निकाळजे (25, रा. जामवाडी, ता. जालना), तुषार हरिष बत्रा (24, रा. परतूर), रोहित संजय बोर्डे (26, रा. जामवाडी) व करण रवी वाहुळे (20, रा. जामवाडी) यांना ताब्यात घेण्यात आले.

सुटका करण्यात आलेल्या महिलांमध्ये पश्चिम बंगाल राज्यातील 6, आसाम राज्यातील 3 व छत्रपती संभाजीनगर येथील 4 आदींचा समावेश आहे. तसेच 81,750 रुपयांची रोख रक्कम व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. सदरबाजार पोलिस ठाण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ही कारवाई पोउपनि गणेश शिंदे, पोउपनि रवी जोशी, पोउपनि संजय गवळी, स्थानिक गुन्हे शाखेचे दीपक युगे, अंकुर धांडे, शुभम राठोड, महिला अंमलदार संगीता चव्हाण, पुष्पा खरटमल, आरती सावळे, चित्रा चव्हाण आदींनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT