Jalna News : मका सोंगणीसाठी हार्वेस्टर मशिनचा वापर file photo
जालना

Jalna News : मका सोंगणीसाठी हार्वेस्टर मशिनचा वापर

उत्पादनात घट, पिंपळगाव रेणुकाई परिसरात दुष्काळाचे सावट, शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची गरज

पुढारी वृत्तसेवा

Jalna News : Use of harvester machine for maize harvesting

पिंपळगाव रेणुकाई, पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील पिंपळगाव रणुकाईसह परिसरात गेल्या तीन नहिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाअभावी मका पिकाची वाढ खुंटली असून कणसे अत्यंत छोटी पडली आहेत. त्यामुळे एकरी उत्पादनात मोठी घट झाली असून उत्पादन खर्चही निघणे मुश्किल झाल्याने शेतकऱ्यांनी कमी खर्चात नका सोंगणीसाठी आधुनिक डार्वेस्टरला पसंती दिली आहे.

यंदा सुरुवातीला पाऊस रिमझिम झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने नक्याची पेरणी केली होती. मात्र ऐन वाढीच्या आणि कणस भरण्याच्या अवस्थेतच पावसाने ओढ दिली. सलग तीन महिने पाऊस न झाल्याने पिके वाळून गेली. कणसात दाणे भरले नसून आकार लहान राहिला आहे. एकरी १५ ते २० क्विंटल अपेक्षित असताना केवळ ५ ते ७ क्विंटलच उत्पादन हाती येत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. अशा परिस्थितीत मजुरांकडून हाताने मका तोडणी करणे शेतकऱ्यांना परवडत नाही.

मजुरीचे दर ४०० ते ५०० रुपये प्रतिदिन झाले असून, एक एकर मका तोडणीसाठी ८ ते १० मजूर आणि ४ ते ५ दिवस लागतात. यासाठी ८ ते १० हजार रुपयांचा खर्च येतो, जो सध्याच्या उत्पादनापेक्षा जास्त आहे. त्यामुळे शेतकऱ्यांने हार्वेस्टरच्या माध्यमातून सोंगणी सुरू केली आहे. हार्वेस्टरने अवघ्या एक ते दीड तासात एक एकर मक्याची काढणी व मळणी पूर्ण होते.

यासाठी केवळ चार ते पाच रुपये खर्च येत असून, शेतकऱ्यांचे ६० टक्के पैसे वाचत आहेत. कमी उत्पादन असतानाही निदान खर्च तरी निघेल या आशेने शेतकरी हार्वेस्टरकडे वळले आहेत. पाऊस नसल्याने उत्पदन्नात मोठी घट झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT