Jalna News : The youth who created terror by carrying a sword was jailed
जालना, पुढारी वृत्तसेवाः शहरातील संजयनगर परिसरात तलवार बाळगून लोकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या एका युवकाला पोलिसांनी अटक केली. सदर युवकाच्या ताब्यातून तीन धारदार तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत.
शहरातील संजय नगर भागात अनिल किशोर मोरे (रा. बोधलपुरी, ता. घनसावंगी, सध्या संजयनगर, जालना) हा तलवार बाळगून फिरत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असता त्याच्याकडून सुमारे ५ हजार ३०० रुपये किमतीच्या तीन धारदार व तीक्ष्ण तलवारी जप्त करण्यात आल्या.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध कदीम जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी व उपविभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. शहरात अवैध शस्त्रामुळे नागरिकांत दहशत आहे.