Jalna News : आन्वा शिवार यंदा ज्वारी पिकाने बहरले file photo
जालना

Jalna News : आन्वा शिवार यंदा ज्वारी पिकाने बहरले

३० वर्षांपासून शेतकऱ्याने ज्वारी पिकाकडे फिरवली होती पाठ

पुढारी वृत्तसेवा

Jalna News: The Anwa area is flourishing with the jowar crop this year

आन्वा, पुढारी वृत्तसेवा : भोकरदन तालुक्यातील आन्वा शिवारात यावर्षी जोरदार पाऊस झाल्याने तलाव, विहिरीत पाणी असल्याने रब्बी हंगामातील ज्वारी पिकाचे क्षेत्र वाढले आहे. आन्वा परिसरातील शेत शिवार ज्वारीच्या पिकांने बहरलेले दिसून येत आहे.

भोकरदन तालुक्यातील आन्वा परिसरात कमी पाण्यातही चांगले उत्पादन देणारे हे पीक शेतकऱ्यांचा आधार होता, पण गेल्या काही वर्षात परिसर बागायती झाल्याने शेतकरी गहू, हरभरा, मका, कापूस अशा नगदी पिकांकडे वळले परिणामी ज्वारीचे आता या परिसरात दुर्मीळ झाले आहे.

या पार्श्वभूमीवर काही शेतकऱ्यांनी ज्वारी पिकविण्याचे धाडस दाखवले सध्या या शेतकऱ्यांच्या शेतात ज्वारी जोमात वाढत आहे. हिरवीगार कणसे आणि भरघोस दाणे पाहून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत आहे.

मात्र, ज्वारीला सर्वाधिक धोका पक्ष्यांकडून आहे. कमी क्षेत्रावर ज्वारी असल्याने पक्ष्यांचे थवे पिकाकडे आकर्षित होत आहेत, दाणे भरायला सुरुवात झाल्यावर पक्षी हल्ला करतील की नाही याबाबत साशंक आहेत. कमी पर्जन्यमान आणि इतर सुविधांचा अभावामुळे जुन्या काळात शेतकऱ्यांचे मुख्य पीक ज्वारीच होते.

परंतु मागील ३० वर्षापासून परिसरातील शेतकऱ्याने ज्वारी पिकाकडे पाठ फिरवल्यामुळे परिसरामध्ये ज्वारी पीक दुर्मीळ झाले आहे. रब्बीतील पाण्याची सोय झाली. त्यामुळे ज्वारीचे पीक कमी झाले, तरी आम्ही परंपरा जपण्यासाठी ज्वारीचे पीक घेतले आहे. यंदा पीक चांगले आले; पण पक्ष्यांचा प्रश्न मोठा आहे. काही शेतकरी पक्ष्यांपासून संरक्षणासाठी पारंपरिक जुगाड करतात बेगड पट्टया, डरकाळ्या किंवा शेताद फिरणारे माणसे, पण मोठ्या प्रमाणात पक्ष्यांचे थवे आल्यास हे पुरेसे ठरत नाहीत.

भाव देण्याची मागणी

यावर्षी पाऊस चांगला झाल्याने ज्वारी, हरभर पीक आन्वा भागातील शेतकरी यांनी घेतले आहे. परंतु शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी हवालदिल होताना दिसत आहे. शेतमालाल भाव देण्याची मागणी या भागातील शेतकरी वर्गातून होत आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT