Fake Currency Racket : अंबडमध्ये बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश; चौघे गजाआड

१ लाख २२ हजारांचा मुद्देमाल जप्त; एक अल्पवयीन ताब्यात
Fake Currency Racket
Fake Currency Racket : अंबडमध्ये बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश; चौघे गजाआडfile photo
Published on
Updated on

Fake currency racket busted in Ambad; four people have been arrested

अंबड, पुढारी वृत्तसेवा :

पाचशे रुपयांच्या बनावट नोटा खऱ्या म्हणून बाजारात चालवणाऱ्या आणि त्याची विक्री करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा अंबड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. शुक्रवारी रात्री आणि शनिवारी पहाटे केलेल्या धडक कारवाईत पोलिसांनी ४ आरोपींना अटक केली असून, एका विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेतले आहे. या टोळीकडून ५०० रुपये दरच्या १ लाख २२ हजार रुपये किमतीच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणाचे धागेदोरे छत्रपती संभाजीनगरपर्यंत पोहोचले असून, मुख्य सूत्रधार फरार आहे.

अंबड शहरात ५०० रुपयांच्या बनावट नोटांची विक्री करण्यासाठी काही लोक येणार असल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक संतोष घोडके यांना मिळाली होती. त्यावरून शुक्रवारी (दि. ६) रात्री ११ वाजता अंबड-पाचोड रोडवरील मार्डी फाट्यावर सापळा रचण्यात आला. शनिवारी (दि. ७) पहाटे १२:३० वाजेच्या सुमारास संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या विकास अनिल गडगूळ आणि एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्या झडतीत ५०० रुपयांच्या ८० नोटा (दोघांकडे प्रत्येकी ४०) आढळून आल्या.

फरार आरोपीचा शोध सुरू

या प्रकरणातील आरोपी शुभम गोरख खरात (रा. छत्रपती संभाजीनगर) हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष घोडके, उपनिरीक्षक भगवा नरोडे, पोहेकाँ यशवंत मुंढे, दीपक चव्हाण, अरुण मुंढे, विजय केंद्रे संजय क्षीरसागर व पथकाने केली.

जालना कनेक्शन उघड ताब्यात घेतलेल्या आरोपींच्या चौकशीतून समरविरा सुनील खरात (रा. अंबड) याचे नाव समोर आले. पोलिसांनी पहाटे २ वाजता त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून ४० बनावट नोटा जप्त केल्या. त्यानंतर तपासाची चक्रे वेगाने फिरवत पोलिसांनी जालन्यातील लोधी मोहल्ला येथून आकाश नारायण शेळके याला अटक केली. त्याच्याकडून ५०० रुपयांच्या ८४ बनावट नोटा हस्तगत करण्यात आल्या. तसेच या गुन्ह्यात आदित्य अमित गायकवाड (रा. पैठण) यालाही अटक करण्यात आली आहे.

६२ हजारात लाखोंचा सौदा ? :

प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपींनी ६२ हजार रुपये खऱ्या भारतीय चलनाच्या बदल्यात लाखो रुपयांच्या बनावट नोटांची खरेदी-विक्रीचा व्यवहार केल्याचे समजते. हे रॅकेट बनावट नोटा स्वस्तात विकत घेऊन त्या ग्रामीण भागात चालवण्याच्या प्रयत्नात होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news