Jalna News: Sugar factory to lift all sugarcane by the end of February
परतूर, पुढारी वृत्तसेवा : फेब्रुवारी अखेरपर्यंत बिगर नोंदीसह बागेश्वरी साखर कारखाना सर्व ऊस उचलणार असून यंदा ३१०० रु. प्रति मे. टन दर देणार असल्याची माहिती चेअरमन शिवाजीराव जाधव यांनी सन २०२६-२७ च्या गळीत हंगामाचा बॉयलर प्रदीपन करून व गव्हाणी मध्ये मोळी टाकून शुभारंभकरताना दिली. मा बागेश्वरी साखर कारखान्याचा सन २०२६-२७ चा शुभारंभ चेअरमन शिवाजीराव जाधव यांच्या हस्ते बॉयलर प्रदीपन व गव्हाणीमध्ये मोळी टाकून करण्यात आला.
यावेळी प्रमुख उपस्थितीत कार्यकारी संचालक अजय जाधव हे होते. यावेळी पुढे बोलताना चेअरमन शिवाजीराव जाधव म्हणाले की, शेतकऱ्यांचा नोंदी असलेला व बाजार नोंदी असलेला सर्व ऊस कारखाना गाळपास आणणार आहे. तरी शेतकऱ्यांनी इतर कारखान्यांना ऊस देण्याची घाई करू नये. पाऊस नसल्यामुळे शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता यावर्षी कारखाना लवकर सुरू करण्यात आला आहे.
कारखान्यास ऊस देऊन सहकार्य करावे असेही आव्हान शेवटी शिवाजीराव जाधव यांनी केले. यावेळी संचालक अजय शिवाजीराव जाधव शेतकरी राजेंद्र तौर, संतोष दिंडे, जनरल मॅनेजर आर. आर. निर्वळ, वर्क्स मॅनेजर सोपान मोरे, मुख्य शेतकी अधिकारी पी. टी. खंदारे, चीफ केमिस्ट मधुकर कच्छवे, डिस्लरी मॅनेजर सचिन आव्हाड, चिफ इंजीनियर गजानन जाधव वाहन मॅनेजर सुंदराव देशमुख, डेप्युटी इंजिनियर निखिल बोराटे, डेप्युटी चिफ केमिस्ट कैलास नेमाने, इलेक्ट्रॉनिक इंजीनियर संजय सिंग, विठ्ठलराव बागल, स्टोअर किपर समाधान सपकाळ टाईम ऑफिसर महादेव मोरे, केनयार्ड सुपरवायझर ज्ञानेश्वर देशमुख, परचेस विभाग प्रमुख मुंगळे आदी उपस्थित होते.
येत्या शुक्रवारपर्यंत तिसरा हप्ता मिळणार
मागील हंगामातील तिसरा हप्ता २०० रुपयाप्रमाणे येत्या गुरुवार शुक्रवार या दोन दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल तर यावर्षी उसाचा प्रति मे. टन दर हा ३१०० रुपये देण्यात येणार आहे पहिला हप्ता २७०० रुपये प्रमाणे देण्यात येईल. दुसरा हप्ता २०० रु. खरिपाच्या पेरणी वेळी तर तिसरा हप्ता २०० रु. प्रमाणे पुढील हंगामाच्या सुरुवातीला देण्यात येणार आहे.