Jalna News: Soybean crop withers due to lack of rain; farmers in distress
पिंपळगाव रेणुकाई, पुढारी वृत्तसेवाः भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई परिसरात गेल्या दिड महिन्यांपासून पावसाने पाठ फिरवल्याने शेकडो हेक्टरवरील सोयाबीन व मका पीक पाण्याअभावी वाळून चालले आहे. हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.
यंदा सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने सोयाबीनची पेरणी केली होती. पीकही जोमात आले होते. मात्र गेल्या दिड महीन्यापासुन पावसाचा एक थेंबही पडला नाही. त्यामुळे शेंगा भरण्याच्या अवस्थेतील सोयाबीन पाचोळा झाले आहे. पाने पिवळी पडून गळत आहेत. मका पिकाचेही तेच हाल आहेत.
शेतकऱ्यांवर दुहेरी संकट
एकरी १५ ते २० हजार रुपये खर्च करूनही हातात काहीच येणार नसल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. बियाणे, खत, फवारणीचा खर्चही निघणे कठीण झाले आहे. "पेरणीपासून आतापर्यंत २५ हजार रुपये खर्च झाला, पण आता पीक वाळल्याने जनावरांना वैरण म्हणूनही उपयोग होणार नसल्याने शेतकरी धास्तावले आहेत.