Jalna News : पिंपळगाव रेणुकाई येथे गाळ उपसा कामास प्रारंभ file photo
जालना

Jalna News : पिंपळगाव रेणुकाई येथे गाळ उपसा कामास प्रारंभ

सुपीक मातीचा शेतात टाकण्यासाठी वापर; पाणी क्षमता वाढण्यास मदत

पुढारी वृत्तसेवा

Jalna News: Silt removal work begins at Pimpalgaon Renukai

पिंपळगाव रेणुकाई, पुढारी वृत्तसेवा : भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथे नाला व बंधाऱ्यातील गाळ उपसा करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. गाळमिश्रित सुपीक माती शेतात टाकल्याने जमिनीचा पोत सुधारून उत्पादन वाढण्यास मदत होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नाल्यात साचलेल्या गाळामुळे पाण्याची साठवण क्षमता कमी झाली होती वैयक्तिक जेसीबीच्या साहाय्याने गाळ काढण्याचे काम हाती घेण्यात आले. काढलेला काळा गाळ ट्रॅक्टर-ट्रॉलीद्वारे थेट शेतकऱ्यांच्या शेतात पोहोचवला जात आहे.

शेतकरी सांगतात, "या गाळात सेंद्रिय कर्बाचे प्रमाण जास्त असते. रासायनिक खतावरील खर्च वाचून जमीन भुसभुशीत होते. कापूस, सोयाबीन व तूर पिकांना याचा मोठा फायदा होतो गाळ टाकल्यास जमिनीची सुपीकता २० टक्क्यांपर्यंत वाढते. सध्या दिवसाला ३० ते ४० जात आहे. खरीप हंगामापूर्वी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ मिळावा, यासाठी खरिपाच्या कामाला गती नाल्याची खोली वाढून पावसाळ्यात पाणी जिरण्यास व भूजल पातळी वाढण्यासही मदत होणार आहे.

यापूर्वीही गाळ उपसा करण्यासाठी शासनाच्या वतीने गाळ उपसा योजना राबविण्यात आली होती. त्यामुळे भोकरदन तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना विहिरींना पाणी पातळी वाढ झाली होती. गाळ शेतात टाकल्याने परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनी सुपीक होऊन उत्पन्नात वाढ झाली आहे.
आ. संतोष दानवे, आमदार
माझा वैयक्तिक खर्च करून गाळ उपसा केला आहे. गाळ उपसा केलल्या नदी-नाल्यामध्ये पाणी साठवून परिसरातील विहिरीची पाणी पातळीत वाढ होते. पिकांना वेळेवर पाणी दिल्यास उत्पन्नात वाढ होते.
विठ्ठल देशमुख, शेतकरी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT