Jalna News : जिल्हा रुग्णालयात एमआरआय file photo
जालना

Jalna News : जिल्हा रुग्णालयात एमआरआय

आ. अर्जुनराव खोतकर यांच्या पाठपुराव्याला यश

पुढारी वृत्तसेवा

Jalna News: MRI Facility at District Hospital

जालना, पुढारी वृत्तसेवा : शिवसेना उपनेते तथा आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या सातत्यपूर्ण पुराव्यामुळे जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात अत्याधुनिक एमआरआय सेंटरचे उद्घाटन आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते संपन्न झाले. यामुळे जालना जिल्ह्यातील रुग्णांना आता तपासणीसाठी छत्रपती संभाजीनगर, पुणे किंवा इतर शहरांकडे धाव घ्यावी लागणार नाही. कमी वेळेत आणि कमी खर्चात स्थानिक पातळीवरच अत्याधुनिक तपासणी सुविधा उपलब्ध होणार आहे.

मुंबई येथे काही दिवसांपूर्वी आमदार अर्जुनराव खोतकर यांनी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांची भेट घेतली होती. या बैठकीदरम्यान जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात अत्याधुनिक एमआरआय सेंटर उपलब्ध करून देणे, आधुनिक आरोग्य सुविधा वाढवणे तसेच नागरिकांना तातडीच्या वैद्यकीय सेवा मिळण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात केली होती.

या बैठकीनंतर तातडीने निर्णय घेत रुग्णालयासाठी आधुनिक मशीन मंजूर करण्यात आल्या. सेंटरचा शुभारंभ मंगळवारी करण्यात आला. जालना जिल्हा सामान्य रुग्णालय येथे एमआरआय मशिन २४ तारखेपासून सुरू करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेला मोठी बळकटी मिळणार आहे.

यांची उपस्थिती

या वेळी शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र पाटील, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र गाडेकर, रेडिओलॉजिस्ट डॉ. प्रदीप कुलकर्णी, डॉ. वायाळ, डॉ. मनोज जाधव, कृष्णा इमेजिंग सेंटर व्यवस्थापक व तांत्रिक अधिकारी कर्मचारी रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT