kidnapping case Pudhari Photo
जालना

Kidnapping Case : दूध आणण्यासाठी गेलेल्या ४५ वर्षीय शेतकऱ्याचे अपहरण !

कुंभार पिंपळगाव येथील अण्णाई डेअरीसमोर घडला प्रकार

पुढारी वृत्तसेवा

Jalna News: Kidnapping of a 45-year-old farmer who went to fetch milk!

जालना, पुढारी वृत्तसेवाः दूध आणण्यासाठी गेलेल्या ४५ वर्षीय शेतकऱ्याला अण्णाई दूध डेअरीसमोरून अज्ञात तीन इसमांनी स्विफ्ट कारमध्ये टाकून पळवून नेल्याची थरारक घटना घडली आहे. कुंभारपिंपळगाव (ता. घनसावंगी) येथे बुधवारी (२ रोजी) सकाळी सात वाजेच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी घनसावंगी पोलिस ठाण्यात अज्ञात तिघांविरुद्ध अपहाराचा गुन्हा दाखल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विरेगव्हान तांडा येथील रहिवासी परमेश्वर सोपान राठोड (वय ४५) हे बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे कुंभारपिंपळगाव येथील अण्णाई दूध डेअरीवर दूध आणण्यासाठी गेले होते. तेथे अचानक आलेल्या एका स्विफ्ट डिझायर कारमधून तीन अज्ञात व्यक्ती उतरल्या आणि त्यांनी परमेश्वर राठोड यांना जबरदस्तीने गाडीत कोंबून पळ काढला. हा प्रकार डेअरीचालक साबळे यांनी प्रत्यक्ष पाहून तातडीने राठोड यांच्या मित्रांना व नातेवाईकांना कळवला.

दरम्यान, परमेश्वर राठोड यांचा मुलगा अक्षय हे छत्रपती संभाजीनगर येथे राहतात. त्यांना ही माहिती त्यांच्या आईकडून समजताच त्यांनी वडिलांच्या मोबाईलवर संपर्क साधला. फोन एका अनोळखी व्यक्तीने उचलला. "तुझ्या वडिलांना माजलगावला घेऊन चाललोय, तू आम्हाला माजलगावला येऊन भेट!" असे सांगून अपहरणकर्त्याने फोन कट केला. नातेवाईकांनी माजलगाव व परिसरात शोध घेतला.

मात्र त्यांचा काहीही पत्ता न लागल्याने अखेर पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी मुलगा अक्षय राठोड याच्या तक्रारीवरून घनसावंगी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम १४०(३) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. ठाणे प्रभारी पोलीस निरीक्षक केतन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक अशोक खरात पुढील तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT