Jalna News : टेंभुर्णीच्या कल्पतरू पेट्रोल पंपावर रात्री जेवणाच्या पंगती file photo
जालना

Jalna News : टेंभुर्णीच्या कल्पतरू पेट्रोल पंपावर रात्री जेवणाच्या पंगती

टेंभुर्णी : शेतकरी व वाहनचालकांना मिळाला दिलासा

पुढारी वृत्तसेवा

Jalna News: Dinner arrangements at the Kalpataru Petrol Pump in Tembhurni

टेंभुर्णी, पुढारी वृत्तसेवा : जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी परिसरात गेल्या आठवड्यापासून पेट्रोल आणि डिझेलचा तीव्र तुटवडा जाणवत आहे. डिझेल मिळवण्यासाठी शेतकरी आणि नागरिकांना चक्क पेट्रोल पंपावर रात्रभर मुक्काम करावा लागतं असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. अनेक जण दिवसभर प्रतीक्षा करत पंपावरच थांबून होते. दुपारपासून उपाशीपोटी थांबलेल्या शेतकरी आणि नागरिकांची अवस्था पाहून पेट्रोल पंप चालकांनी सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था पेट्रोल पंपावरच केली.

आखाती देशामध्ये युद्धजन्य परिस्थितीमुळे भारतात आता इंधन टंचाई जाणवून लागली आहे. याचा सगळ्यात मोठा फटका हा ग्रामीण भागांना बसला आहे. ग्रामीण भागामध्ये पेट्रोल पंपावर डिझेल आणि पेट्रोलचा साठा संपत असल्याचं चित्र आहे.

अशातच जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी भागात मागील आठवड्यापासून पेट्रोल आणि डिझेलची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. पंपावर रांगाच रांगा लागल्या आहे. त्यामुळे डिझेलसाठी लोक पंपावर मुक्कामी थांबले, यावेळी पेट्रोल पंपावर रात्री चक्क जेवणाच्या पंगती बसल्या होत्या.

टेंभुर्णी येथील कल्पतरू पेट्रोलियम पंपावर पंपाचे मालक संजय सावंत व त्यांचे पुत्र आकाश सावंत यांनी माणुसकीचे दर्शन घडवले. भर उन्हात उपाशीपोटी उभ्या असलेल्या शेतकऱ्यांच्या पोरांना त्यांनी स्वतः खिचडी व थंडगार पाणी देऊन आदर्श निर्माण केला आहे.

पंपचालकाने जेवण व पाण्याची व्यवस्था केल्यामुळे काहीसा दिलासा मिळाला असला तरी इंधनासाठी दिवसासह रात्रभर रांगेत उभे राहावे लागत असल्याने ग्रामीण भागातील डिझेल टंचाई किती गंभीर बनली आहे, हे स्पष्ट होत आहे. यावेळी शेतकऱ्यांनी शासनाच्या विर- ोधात तीव्र संताप व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT