Court Pudhari
जालना

Insurance Company News : ग्राहक तक्रार आयोगाचा विमा कंपनीला दणका

सर्व कागदपत्राची पूर्तता करून विमा कंपनीकडे त्याची मागणी केली परंतु या विमा कंपनीने मात्र दोघे आज-ारी पडल्यावर त्यांचा क्लेम मंजूर केला नाही.

पुढारी वृत्तसेवा

Jalna News: Consumer Complaints Commission hits insurance company

जालना, पुढारी वृत्तसेवा : जालना येथील भूषण जवाहर जैस्वाल व त्यांची पत्नी मनीषा भूषण जैस्वाल यांनी निवा बुपा हेल्थ इंनशोरन्स कंपनी कडे आपला कुटुंब आरोग्य विमा काढला होता. मात्र हे दोघे दाम्पत्य आजारी पडले त्यांनी काढलेल्या विमा कंपनीकडे आरोग्य विमा मिळावा यासाठी सर्व कागदपत्राची पूर्तता करून विमा कंपनीकडे त्याची मागणी केली परंतु या विमा कंपनीने मात्र दोघे आज-ारी पडल्यावर त्यांचा क्लेम मंजूर केला नाही.

विमा न मिळाल्याने यासाठी या दोघे जैस्वाल दाम्पत्यचा अनुक्रमे रु. २४२१४/- व रु. ३२७६०/- हा कंपनीने नाकारला होता. विमा कंपनीच्या या मनमानी व्यवहारा विरुध्द दोघांनी त्यांचे सहायक पंकज झाडीवाले यांच्या मदतीने जालना येथील जिल्हा ग्राहक तकार निवारण आयोगाकडे अॅड अरविंद एम. जातोडे यांच्यामार्फत धाव घेतली.

त्यांनी विमा कंपनीविरुद्ध तक्रार दाखल केली असता दोघांचा अर्ज सुनावणीअंती जिल्हा ग्राहक तक्रार आयोगाने अनुक्रमे रु. २४४१४ व रु. ५०६७७ रुपयांनी तसेच प्रत्येकी १०,०००/- खर्चासह मंजूर केला. या प्रकरणात विमा कंपनीला आयोगाचा दणका बसून शेवटी दोन्ही पक्षकारांना न्याय मिळाला. सदरचे सर्व कामकाज हे अॅड. ए. एम. जातोडे यांनी पाहिले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT