Jalna News : २० ऑगस्टपर्यंत अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन पूर्ण करा File Photo
जालना

Jalna News : २० ऑगस्टपर्यंत अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन पूर्ण करा

जि.प. शिक्षण विभागाचे गटविकास अधिकाऱ्यांना निर्देश, रिक्त पदाचा अहवाल मागवला

पुढारी वृत्तसेवा

Jalna News: Complete the redeployment of surplus teachers by August 20

जालना, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील शाळांमध्ये मंजूर पदांपेक्षा अतिरिक्त असलेल्या शिक्षकांचे समायोजन करण्याची प्रक्रिया पारदर्शकपणे व शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कृष्णकांत कनवरे यांनी दिले आहेत. ही प्रक्रिया २० ऑगस्ट पर्यंत पूर्ण करून समायोजित शिक्षक, मुख्याध्यापक व पदवीधर शिक्षकांची माहिती तसेच रिक्त पदांचा अहवाल तातडीने सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

शिक्षण विभागाने गटविकास अधिकाऱ्यांना पाठविलेल्या पत्रानुसार, शाळांमध्ये मंजूर पदांपेक्षा अधिक शिक्षक कार्यरत असल्यास त्यांचे समायोजन करणे आवश्यक आहे. तसेच ज्या शाळांमध्ये शिक्षकांची संख्या मंजूर पदांच्या तुलनेत कमी आहे, अशा शाळांमध्ये शिक्षकांचे समायोजन करण्यात येणार आहे. समायोजनाची कार्यवाही शासन निर्णयातील मार्गदर्शक तत्त्वांनुसार काटेकोरपणे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

२०२५-२६ मधील संचमान्यतेनुसार तात्पुरते समायोजन करण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार होती. मात्र काही ठिकाणी २०२५-२६ ची संचमान्यता झालेली नसल्यास, मागील तुलनेतील विद्यार्थी संख्या कमी झाली नसल्यास आणि २०२४-२५ ची संचमान्यता विचारात घेऊन समायोजनाची कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, शिक्षकांच्या पदोन्नतीबाबत न्यायालयात याचिका दाखल झाल्याने काही काळ समायोजन प्रक्रिया स्थगित ठेवण्यात आली होती. मात्र संबंधित स्थगिती उठविण्यात आल्याने ६ ऑगस्टपर्यंतची स्थगिती स संपुष्टात आल्याचे पत्रात नमूद करण्यात स आले आहे. आयुक्त (शिक्षण) यांच्याि ११ ऑगस्ट रोजीच्या ऑनलाइन बैठकीतील सूचनांनुसार समायोजन त प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे आदेश म देण्यात आले आहेत. प्रक्रिया पूर्ण न केल्यास संबंधित शिक्षकांचे एप्रिलचे वेतन सेवा मान्यतेनुसार मंजूर पदापेक्षा जास्त पदाचे वेतन व भत्ते शालार्थ त प्रणालीतून अदा करता येणार नसल्याचा व इशाराही देण्यात आला.

सीईओचे निर्देश

समायोजन प्रक्रिया २० ऑगस्टपर्यंत पूर्ण करून त्याबाबतचा अहवाल जिल्हा परिषद कार्यालयास सादर करावा, असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कृष्णकांत कनवरे यांनी दिले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT