Green Chilli Pudhari
जालना

Chilli Price : मिरचीच्या दरात मोठी घसरण; ६५ रुपयांवरून दर २२ ते २५ रुपयांवर

भोकरदन तालुक्यात मिरचीचे भाव कोसळल्याने उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत.

पुढारी वृत्तसेवा

Jalna News : Big fall in chilli prices; From Rs 65 to Rs 22 to Rs 25

भोकरदन, पुढारी वृत्तसेवाः भोकरदन तालुक्यात मिरचीचे भाव कोसळल्याने उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. काही दिवसांपूर्वी ६३ ते ६५ रुपये किलोने विक्री झालेल्या मिरचीचे भाव कोसळून २२ ते २५ रुपये किलोवर आले आहे. सध्या बाजारात मिरचीला उठाव नसतांनाच मिरचीची आवक वाढली आहे. दुसरीकडे मिरचीवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने मिरचीचा दर्जाही खालावला आहे.

तालुक्यातील वालसावंगी, धावडा परिसरात मिरची उत्पादक शेतकऱ्यांना सध्या मिरचीच्या दरात झालेल्या घसरणीचा मोठा फटका बसत आहे. काही दिवसांपूर्वी मिरचीला ६३ ते ६५ रुपये किलोपर्यंत भाव मिळत होता. मात्र आता मिरचीचे दर थेट २२ ते २५ रुपये किलोपर्यंत घसरले आहेत.

त्यामुळे मिरची उत्पादक शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असून, शासनाने तातडीने हस्तक्षेप करून मिरचीला योग्य दर मिळवून द्यावा, अशी मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT