Jalna News : चालू पंधरवड्यात ६७ गुन्हे दाखल, ६२ जणांना अटक file photo
जालना

Jalna News : चालू पंधरवड्यात ६७ गुन्हे दाखल, ६२ जणांना अटक

जालन्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाची छापेमारी सुरू जिल्हाभरातील अवैध दारूविक्रेत्यांवर कडक कारवाई

पुढारी वृत्तसेवा

Jalna News: 67 cases registered, 62 individuals arrested in the current fortnight

संघपाल वाहूळकर

जालनाः जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध दारुविक्रेत्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने धडक कारवाई करण्यात येत आहे. नोव्हेंबर महिन्याचा पहिल्या पंधरवड्यात जिल्हाभरातील विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुमारे ६७ गुन्हे दाखल करण्यात आले असून, एकूण ६२ जणांना अटक करण्यात आली आहे. यामुळे अवैध दारु विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

दरम्यान, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच जिल्ह्यात धडक कारवाईची मोहीम राबवण्यात आली असून, १ ते १४ नोव्हेंबर दरम्यान तब्बल ६७ गंभीर गुन्हे (एफआयआर) दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे अवैध दारु विक्री करणाऱ्याविरोधात भितीचे वातावरण पसरले आहे.

मिळालेल्या आकडेवारीनुसार, जालना जिल्ह्यांतर्गत येणाऱ्या अंबड, परतूर, भोकरदन, जाफराबाद, जालना शहर, कदीम जालना, घन्सवंगी, बदनापूर यांसह विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली. विशेषतः ढाबे, हॉटेल, शेतशिवारातील पत्रे शेड पानटपऱ्या आणि हॉटेलच्या आडोशाने सुरू असलेल्या अवैध मद्यविक्रीवन उत्पादन शुल्क विभागाने सखोल छापे टाकले आहेत.

उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने केलेल्या य कारवाईत आरोपींना जागेवरच ताब्यात घेण्यात आले असून मोठ्या प्रमाणावर अवैध मद्यसाठा व वाहन जप्त करण्यात आले आहेत. या धडक मोहिमेमुळे अवैध दारू विक्र करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून प्रशासनाने यापुढेही अशीच कठोन कारवाई सुरू राहणार असल्याच इशारा दिला आहे. जिल्हाभरातील विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारु विक्रीविरोधात कारवाई करण्यात येत आहे.

अवैध दारु विक्री केल्यास कठोर कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने १ ते १४ नोव्हेंबर दरम्यान राज्य उत्पादन विभागाने कडक कारवाई केली आहे. जिल्हाभरात ठिकठिकाणी छापे मारले आहेत. एकूण ६७ गुन्हे दाखल झाले असून, त्यापैकी ६२ जणांना अटक करण्यात आली आहे. अवैध दारु विक्री केल्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने कठोर कारवाई करण्यात येईल
- ज्ञानेश्वरी आहेर, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग, जालना

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT