Jalna News : सत्तर वर्षीय महिलेच्या पोटातून काढली दीड किलोची गाठ file photo
जालना

Jalna News : सत्तर वर्षीय महिलेच्या पोटातून काढली दीड किलोची गाठ

महिला रुग्णाचे सत्तर वर्षांपेक्षा अधिक असल्याने ही शस्त्रक्रिया आव्हानात्मक होती.

पुढारी वृत्तसेवा

Jalna News: 1.5 kg tumor removed from 70-year-old woman's abdomen

भोकरदन, पुढारी वृत्तसेवा : पोटदुखी व अंडाशयातील मोठ्या गाठीच्या त्रासाने तब्बल सात ते आठ वर्षे वेदना सहन करणाऱ्या सत्तर वर्षीय लक्ष्मीबाई मैंद यांच्यावर भोकरदन येथील एका खासगी रुग्णालयात महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत मोफत व यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेद्वारे त्यांच्या पोटातील सुमारे एक ते दीड किलो आकाराची गाठ यशस्वीरीत्या काढण्यात आली.

लक्ष्मीबाई मैंद यांनी गेल्या काही वर्षांत विविध रुग्णालयांत उपचार घेतले; मात्र प्रकृतीत अपेक्षित सुधारणा होत नव्हती. अखेर त्यांनी भोकरदन येथील एका खासगी रुग्णालयात दाखल होत डॉ. वैभव वानखेडे यांना दाखविले. त्यांनी विविध तपासण्या केल्या. महिला रुग्णाचे सत्तर वर्षांपेक्षा अधिक असल्याने ही शस्त्रक्रिया आव्हानात्मक होती.

मात्र डॉ. वैभव वानखेडे व डॉ. ज्योती वानखेडे यांनी अत्यंत कुशलतेने व नियोजनबद्ध पद्धतीने शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण केली. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती उत्तम असून त्यांना मोठा दिलासा मिळाला.

रुग्ण लक्ष्मीबाई मैंद या सात-आठ वर्षांपासून पोटाच्या त्रासामुळे त्रस्त होत्या. अनेक ठिकाणी उपचार करूनही त्यांना आराम मिळाला नाही. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करून गाठ काढण्यात आल्यानंतर त्यांची प्रकृती चांगली असल्याचे डॉ. वैभव वानखेडे, डॉ. ज्योती वानखेडे यांनी सांगीतले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT