जालना ः महापालिकेच्या विशेष सभेत माहिती देताना महापौर वंदना मगरे, व्यासपीठावर उपमहापौर राजेश राऊत, नम्रता चाटे आदी. pudhari photo
जालना

Jalna civic issues : नगरसेवकांनी विकासाच्या मुद्द्यावर प्रशासनास धरले धारेवर

पाणीपुरवठा, स्वच्छता व नागरी सुविधांबाबत केल्या सूचना

पुढारी वृत्तसेवा

जालना : शहरातील पाणी पुरवठा, स्वच्छता यासह इतर नागरी सुविधांवर नगरसेवकांनी प्रशासनाला सोमवार दि. 16 रोजी पार पडलेल्या विशेष सभेत चांगलेच धारेवर धरले.

जालना शहर महानगरपालिकेची विशेष सभा महापौर वंदना मगरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी व्यासपीठावर उपमहापौर राजेश राऊत आणि सामान्य प्रशासन विभागाच्या उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे यांची उपस्थिती होती.

या सभेत शहरातील विविध नागरी समस्यांवर चर्चा करण्यात आली. पाणीटंचाई, स्वच्छता व्यवस्था तसेच नागरिकांशी संबंधित इतर विषयांवर नगरसेवकांनी प्रशासनासमोर मुद्देसूद मते मांडली.

सभेत एकूण नऊ विषयांवर चर्चा करण्यात आली. शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना, कचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्याबाबत तसेच विविध भागांतील नागरी सुविधांबाबत नगरसेवकांनी सूचना केल्या.

नागरिकांना मूलभूत सुविधा अधिक चांगल्या पद्धतीने मिळाव्यात, यासाठी प्रशासनाने आवश्यक पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. सभेच्या प्रारंभी काही प्रशासकीय प्रक्रियांमुळे कामकाज सुरू होण्यास थोडा वेळ लागला. त्यानंतर नियमानुसार सभेचे कामकाज पार पडले.

नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मनपाने पुढील काळात ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT