जालना ः जालना महापालिकेच्या सभापती-उपसभापती निवडीसाठी आयोजित बैठकीस उपस्थित अधिकारी. दुसऱ्या छायाचित्रात निवडीनंतर सभापती व उपसभापती  (छाया ः किरण खानापुरे )
जालना

Jalna muncipal corporation : महापालिका सभापती-उपसभापती निवड बिनविरोध

भाजपाचे वर्चस्व, निवडीनंतर समर्थकांचा जल्लोष, मान्यवरांकडून नवनिर्वाचितांचे अभिनंदन

पुढारी वृत्तसेवा

जालना : जालना महापालिकेच्या स्थायीसह विषय समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवडणूक मंगळवार (17)रोजी बिनविरोध पार पडली. भाजपाचे सहा सभापती व पाच उपसभापती बिनविरोध निवडून आले.

महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी अशोक ऊर्फ लक्ष्मीकांत मनोहर पांगारकर, महिला व बालकल्याण सभापती पदाकरिता संध्या संजय देठे, उपसभापती पदाकरिता पद्मा अजित मानधनी, स्वच्छता व आरोग्य समिती सभापती पदासाठी कपिल श्रावण भुरेवाल व उपसभापती पदासाठी अनामिका विजय पांगारकर, बांधकाम समिती सभापती माया मनोज जोशी व उपसभापती पदाकरिता ऐश्वर्या आडेकर शिक्षण व विद्युत सभापती पदासाठी भाग्यश्री जोगस व उपसभापती पदासाठी कार्तिकी इंगळे, पाणीपुरवठा व जलनिस्सारण सभापती पदाकरिता पूनम राजेश स्वामी व उपसभापती पदासाठी अनिता मोहन खोडवे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

पीठासीन अधिकारी म्हणून मिसाळ, महापौर वंदना मगरे, उपमहापौर राजेश राऊत यांनी नवनिर्वाचित सभापतींना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले. यावेळी अर्चना जाधव, नंदा गायकवाड, विजय फुलंब्रीकर, बंडू जाधव यांच्यासह महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

सभापती उपसभापतींचे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, माजी मंत्री आ.बबनराव लोणीकर, आ.नारायणभाऊ कुचे, आ.संतोष दानवे, निवडणूक प्रमुख तथा माजी आमदार कैलाश गोरंट्याल तसेच भाजपा जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर दानवे, महापौर वंदना मगरे, उपमहापौर राजेश राऊत, माजी आ. ॲड. विलास खरात, सतीश घाटगे, माजी जिल्हाध्यक्ष रामेश्वर पाटील भांदरगे, गटनेते महेश निकम, प्रतोद रमेश गौरक्षक यांनी अभिनंदन केले.

नागरिकांचे लक्ष

सभापती-उपसभापती निवडीनंतर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. सभापती व उपसभापतींच्या कामाकडे नागरिकांचे लक्ष राहणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT