जालना ः आरोग्य सेवा (शहरी) चे आयुक्त सुनील भोकरे यांनी जालना शहर महापालिकेला भेट दिली. यावेळी त्यांचा प्रभारी आयुक्त नम्रता चाटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. pudhari photo
जालना

vaccination drive Jalna : माता-बाल संगोपन व लसीकरणावर भर

योजनांची अंमलबजावणी करून नागरिकांना दर्जेदार सेवा द्या: आयुक्त भोकरे

पुढारी वृत्तसेवा

जालना ः शहरी आरोग्य सेवेचे राज्य आयुक्त सुनील भोकरे यांनी शुक्रवार, दि. 20 रोजी सकाळी जालना महानगरपालिकेला भेट देत शहरातील आरोग्य व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी लसीकरण मोहीम, नागरी आरोग्य केंद्रांचे कामकाज तसेच माता-बाल संगोपन यावर त्यांनी विशेष लक्ष केंद्रित करत प्रशासनाला आवश्यक त्या सूचना दिल्या.

यावेळी प्रभारी आयुक्त नम्रता चाटे, सहायक आयुक्त केशव कानपुडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अतुल राजे यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी, डॉक्टर व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीदरम्यान भोकरे यांनी गरोदर मातांची वेळेत नोंदणी करून त्यांचे लसीकरण शंभर टक्के पूर्ण करण्यावर भर देत माता व बाल संगोपनाची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याचे निर्देश दिले. तसेच नागरी आरोग्य केंद्रांमार्फत नागरिकांना दिल्या जाणाऱ्या वैद्यकीय सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी आवश्यक सुधारणा करण्याचे मार्गदर्शनही केले. शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावा यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याचे आवाहन त्यांनी प्रशासनाला केले.

आरोग्य केंद्राची केली पाहणी

आयुक्त सुनील भोकरे यांनी शहरातील विविध नागरी आरोग्य केंद्रांना भेट देत औषधसाठा, स्वच्छता, रुग्ण नोंदणी आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती याची प्रत्यक्ष पाहणी केली.

आरोग्य केंद्रांतील एकूण सुविधांबाबत समाधानकारक आहे. तरी आवश्यक त्या ठिकाणी सुधारणा करण्यात याव्यात. शहरवासीयांना देण्यात येणाऱ्या आरोग्य सेवांची गुणवत्ता अधिक उंचावण्यावर भर दिला जावा. जालना महानगरपालिकेच्या आरोग्य व्यवस्थेचा दर्जा उंचावण्यासाठी प्रशासनाने सातत्याने प्रयत्नशील राहावे, अधिकाऱ्यांनी चांगले काम करणे अपेक्षित आहे.
सुनील भोकरे, राज्य आयुक्त, शहरी आरोग्य सेवा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT