BJP Shiv Sena Alliance Broken Pudhari
जालना

Jalna Municipal Election | छत्रपती संभाजीनगर पाठोपाठ जालन्यातही भाजप शिवसेनेची युती तुटली

Jalna Politics | शिंदे शिवसेना - भाजप जालना महापालिकेच्या निवडणुकीत एकमेकांसमोर उभे ठाकणार

पुढारी वृत्तसेवा

BJP Shiv Sena Alliance Broken

जालना : जालना महापालिका निवडणुकीसाठी गत दोन महिन्यापासून सुरू असलेल्या महायुतीच्या महानाट्यावर अखेर आज (दि.३०) पडदा पडला. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती तुटल्याचे जाहीर करण्यात आले. दरम्यान, यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने महायुतीतून बाहेर पाडल्याचे जाहीर केले होते.

आता शिवसेना शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टी जालना महापालिकेच्या निवडणुकीत एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. भाजप नेते माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी भाजप स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यांनी आज याबाबत जाहीर घोषणा केली.

जालन्यात भाजप 35 शिवसेना 30 चा आकडा फायनल झाला होता. पण आम्हाला 35 द्या तुम्ही 30 द्या, अशी मागणी शिवसेनेची होती. भाजपच्या जागाही शिवसेनेने मागितल्या होत्या, असे माजी आमदार कैलास गोरंट्याल म्हणाले.

पहिल्या वहिल्या 29 व्या जालना महापालिकेच्या निवडणुकीच्या रणसंग्रामाचे चित्र तीन तारखेला स्पष्ट होणार आहे. महायुती तुटल्यानंतर महाविकास आघाडी काय निर्णय घेते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT