विनयभंगप्रकरणी आरोपीस एका वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा pudhari photo
जालना

Jalna Crime : विनयभंगप्रकरणी आरोपीस एका वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा

वीस हजार रुपयांचा दंडही ठोठावला

पुढारी वृत्तसेवा

पिंपळगाव रेणुकाई ः भोकरदन तालुक्यातील पारध पोलिस ठाण्यांतर्गत दाखल महिलेच्या विनयभंग गुन्हाप्रकरणी संशयित आरोपीला एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. शिवाय, वीस हजार रुपयांचा दंड ही ठोठावण्यात आला आहे.

दरम्यान, सन 2020 मध्ये लॉकडाऊन काळात एका महिलेची आरोपी रमेश अशोक साळवे (रा. जानेफळ गायकवाड ता. भोकरदन) याने पीडित महिलेचा विनयभंगासह लोटलाट करून शिवीगाळ करून जीवे मारण्याची धकमी दिली होती. महिलेच्या तक्रारीवरून पारध पोलि ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास पोलिस ठाणे अधिकारी यांनी पोलीस हवालदार प्रकाश सिनकर यांच्याकडे दिला होता.

आरोपी विरुद्ध दोषारोपपत्र मा. प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी भोकरदन यांचे न्यायालयात दाखल केले. या प्रकरणात न्यायालयाने दोन्ही पक्षांचा युक्तिवाद एकूण घेत या प्रकरणाचा निकाल न्यायमूर्ती मयुरेश आर. काळे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालय यांनी दिला. या प्रकरणात गुन्ह्याचे तपास अधिकारी पोलिस हवालदार प्रकाश सिनकर यांचीसुद्धा साक्ष घेतली. यामध्ये पीडितेने कथन केलेली घटना आणि पोलिस हवालदार प्रकाश शिंनकर यांची साक्ष महत्त्वाची ठरली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT