जालना : मोबाईल टॉवरचे डी.आर.यू. कार्ड चोरणाऱ्या आरोपीस ताब्यात घेतल्यानंतर आरोपीसह पोलिस अधिकारी व कर्मचारी.  pudhari photo
जालना

Jalna Theft News : मोबाईल टॉवरचे डी.आर.यू. कार्ड चोरणारा आरोपी जेरबंद

जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत १५ हजार रुपये

पुढारी वृत्तसेवा

जालना : जालना जिल्ह्यात मोबाईल टॉवरवरील डी.आर.यू. कार्ड चोरी करणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. या कारवाईत पोलिसांनी चोरीची तीन डी.आर.यू. कार्ड जप्त केली असून, दोन चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत १५ हजार रुपये आहे.

जिल्ह्यात मोबाईल टॉवरवरील डी.आर.यू. कार्ड चोरीच्या घटनांचा शोध घेऊन आरोपींना अटक करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांनी पथकाला तपासाबाबत मार्गदर्शन केले.

दरम्यान, २७ नोव्हेंबर रोजी मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी वसिम सलीम शेख (रा. शेकटा, ता. छत्रपती संभाजीनगर) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने बदनापुर तालुक्यातील सायगाव डोंगरगाव येथील इंडस कंपनीच्या मोबाईल टॉवरवरील तीन डी.आर.यू. कार्ड तसेच अंबड तालुक्यातील शेवगा येथील इंडस कंपनीच्या मोबाईल टॉवरवरील तीन डी.आर.यू. कार्ड चोरी केल्याची माहिती समोर आली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू, अपर पोलीस अधीक्षक डॉ. विक्रम साळी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव व त्यांच्या पथकाने केली.

या पथकात पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ यांच्यासह पोलीस अंमलदार लक्ष्मीकांत आढे, संदीप चिंचोले, सागर बाबास्कर, दत्ता वाघुंडे, बाबा गायखवाड, शिवप्रसाद एखंडे, कैलास चेक आणि अशोक जाधव यांचा सहभाग होता.

गुन्हा दाखल

पोलिसांनी आरोपीकडून १५ हजार रुपये किमतीची तीन डी.आर.यू. कार्ड जप्त केली आहेत. या कारवाईमुळे बदनापूर व अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे दोन्ही गुन्हे उघडकीस आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT