जालना ः शहरातील जुना जालना भागात चाकू घेऊन फिरणाऱ्या संशयितास पोलिसांनी जेरबंद केल्यानंतर आरोपीसह पोलिस अधिकारी व कर्मचारी.  pudhari photo
जालना

Jalna Crime : चाकू घेऊन फिरणारा संशयित जेरबंद

कदीम जालना पोलिसांची शहरात कारवाई

पुढारी वृत्तसेवा

जालना ः जालना शहरात चाकू घेऊन फिरणाऱ्या एका इसमाला कदिम जालना पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार 23 मार्च रोजी रात्री सुमारे 11.30 वाजण्याच्या सुमारास कदिम जालना पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिस गस्त घालत असताना संशयित इसम सार्वजनिक ठिकाणी फिरताना आढळून आला. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक धारदार चाकू आढळून आला.

सदर इसमाने त्याचे नाव सनमती रामराव गजर (वय 44, रा. खडकपुरा कबाडी मोहल्ला, जालना) असे सांगितले आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चाकू जप्त केला असून त्याच्याविरुद्ध कदीम जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून संबंधित अधिकाऱ्यांनी ही कारवाई पार पाडली आहे.

कारवाया सुरूच राहणार

शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अशा प्रकारच्या कारवायांना पुढेही सुरू ठेवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT