पोलीस वसाहतीमध्ये जप्त वाहनासह सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर, उपनिरीक्षक बलभीम राऊत, किरण हावले, जमादार अशोक नागरगोजे, सचिन साळवे  Pudhari Photo
जालना

जालना: गोदावरी पात्रातून अवैध वाळू उपसा, ५ जणांना अटक ; २२ लाखांचा मुद्देमाल जप्त

Jalna Crime News | चालकासह मालकावरही गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

शहागड, पुढारी वृत्तसेवा : अंबड तालुक्यातील गोदावरी नदीपात्रात अवैध वाळू उत्खनन व वाहतूक करणारे दोन ब्रास हायवासह चालक- मालक लोकेशन देणारे 5 आरोपींना गोंदी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 22 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई आज (दि. 31) सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी केली. (Jalna Crime News)

याबाबत अधिक माहिती अशी की, आज सकाळी 6 वाजता सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर, उपनिरीक्षक बलभिम राऊत, उपनिरीक्षक किरण हावले, जमादार अशोक नागगोजे, वैजनाथ काळे, गोपीनीय शाखेचे सचिन साळवे, शाकेर सिद्दिकी, दीपक भोजने यांनी वेशांतर करत सिध्देश्वर फाटा येथे छापा टाकून ही कारवाई केली.

यावेळी हायवा चालक राहुल राजु राठोड (वय 23, रा. गुंडेवाडी ता. अंबड), वाहन मालक संतोष ज्ञानेश्वर भुमकर (रा. अंबड) , विलास कल्याण चौरे (वय 19, रा. अंबड) वाहन चालक मनोज तुळसीराम वैदय (वय 28), मनोज अशोक राऊत, वाहन मालक किशोर आसाराम राठोड (रा. मंठा) यांना अटक करण्यात आली. तर एक वाळू तस्कर फरार झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT