जालना ः जप्त करण्यात आलेल्या घरगुती गॅस सिलिंडरसह उपविभागीय अधिकारी रामदास दौंड, तहसीलदार छाया पवार व इतर अधिकारी.  pudhari photo
जालना

Jalna gas inspection raid : शहरात पुरवठा विभागाचा छापा; 30 घरगुती गॅस सिलिंडर जप्त

हॉटेल्स व व्यावसायिक प्रतिष्ठानांवर अचानक तपासणी

पुढारी वृत्तसेवा

जालना : जालना शहरात अवैध गॅस वापरा विरोधात पुरवठा विभागाने शुक्रवारी (दि. 13) सायंकाळी मोठी कारवाई करत व्यवसायिक कारणांसाठी वापरले जात असलेले 30 घरगुती गॅस सिलिडर जप्त केले. या कारवाईमुळे शहरातील हॉटेल्स व व्यावसायिक प्रतिष्ठानांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

जालना तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाने शहरात अचानक विशेष तपासणी मोहीम राबवली. या मोहिमेदरम्यान अंबड चौफुली, छत्रपती संभाजीनगर चौफुली आणि भोकरदन नाका चौक परिसरातील विविध हॉटेल्स, रेस्टॉरंट्स तसेच व्यावसायिक आस्थापनांची तपासणी करण्यात आली.

बेकायदेशीररीत्या वापरले जाणारे 30 घरगुती गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले. जप्त केलेले सिलिंडर अधिकृत गॅस एजन्सीकडे सुपूर्द करण्यात येणार असून संबंधित व्यावसायिकांविरोधात पोलिस ठाण्यात फौजदारी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

ही कारवाई उपविभागीय अधिकारी रामदास दौंड, तहसीलदार छाया पवार, तालुका पुरवठा अधिकारी प्रकाश जाधव, पुरवठा निरीक्षक दीपक दंडाईत, प्रियंका टाशे व दिलीप मुळे यांच्या पथकाने केली. दरम्यान, नागरिकांनी व्यावसायिक कारणांसाठी घरगुती गॅस सिलिंडरचा वापर करू नये, असा इशारा देण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT