October heat : जालन्यात ऑक्टोबर हीटचा तडाखा ! पारा ३८ अंशांजवळ; पुढील सात दिवस कोरडे हवामान file photo
जालना

October heat : जालन्यात ऑक्टोबर हीटचा तडाखा ! पारा ३८ अंशांजवळ; पुढील सात दिवस कोरडे हवामान

जालना शहर आणि परिसरात पुढील सात दिवसांत 'ऑक्टोबर हीट'चा प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे.

पुढारी वृत्तसेवा

Jalna hit by 'October heat'! Mercury nears 38 degrees

जालना, पुढारी वृत्तसेवा : जालना शहर आणि परिसरात पुढील सात दिवसांत 'ऑक्टोबर हीट'चा प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे. ६ ते १२ ऑक्टोबरदरम्यान आकाश मुख्यत्वे स्वच्छ ते अंशतः ढगाळ राहणार असून हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. या कालावधीत कमाल तापमान ३६ ते ३८ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २३ ते २५ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे.

भारतीय हवामान विभाग आणि प्रमुख हवामान मॉडेल्सच्या अंदाजानुसार, ९ ऑक्टोबर रोजी कमाल तापमान ३७.७ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दिवशी दुपारच्या वेळी उन्हाचा चटका अधिक तीव्र जाणवू शकतो. ७ ऑक्टोबरला कमाल तापमान ३६.३ अंशांपर्यंत राहून आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे.

त्यानंतर ८ ऑक्टोबरला तापमान वाढून ३७.३ अंशांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. ९ ऑक्टोबरला आठवड्यातील सर्वाधिक ३७.७ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले जाण्याची शक्यता आहे. १० ऑक्टोबरलाही कमाल तापमान ३७.३ अंश राहण्याचा अंदाज आहे. ११ व १२ ऑक्टोबरला तापमानात किंचित घट होऊन ते अनुक्रमे ३६.८ आणि ३६.५ अंशांपर्यंत राहू शकते. असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

दुपारी बाहेर पडणे टाळावे

दुपारच्या वेळी उन्हाचा चटका अधिक जाणवणार असला, तरी रात्री आणि पहाटेच्या वेळी वातावरण तुलनेने सुखावह राहण्याची शक्यता आहे. पुढील सात दिवसांत हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार आहे. दुपारच्या वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी शक्यतो दुपारच्या तीव्र उन्हात अनावश्यक बाहेर जाणे टाळावे, पुरेसे पाणी प्यावे आणि उन्हापासून संरक्षण करावे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT