Jalna News : पावसाने मोडले शेतकऱ्यांचे कंबरडे, शेतांची झाली तळी  File Photo
जालना

Jalna News : पावसाने मोडले शेतकऱ्यांचे कंबरडे, शेतांची झाली तळी

तळणी मंडळात २१ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

पुढारी वृत्तसेवा

Jalna Heavy Rain due to agriculture loss

तळणी, पुढारी वृत्तसेवा : मंठा तालुक्यातील तळणी कृषी मंडळात रविवारी (ता.२२) मध्यरात्री कोसळलेल्या ढगफुटीसदृश्य पावसाने शेतकऱ्यांचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे. चोवीस तासात १४७मीमी पडलेल्या पावसामुळे मंडळात पाणीबाणीची परिस्थीती निर्माण झाली आहे.

मंडळात महसूल, कृषी व पंचायत समितीच्या संयुक्त अहवालानुसार तब्बल २० हजार ९१० हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. सरकारच्या ढिसाळ कारभाराविरोधात शेतकऱ्यांत प्रचंड संताप व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांना संपूर्ण मदत मिळावी म्हणून जिल्हाधीकारी यांच्या दालनात परिसरातील शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले होते. त्यानंतर प्रशासन कोणती कार्यवाही करते याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. तळणी परीसर हा विदर्भ व मराठवाड्याच्या सिमेवर असल्याने रेड अलर्ट घोषित झाला की तळणीत पाऊस पडतो.

संपूर्ण मंठा तालुक्यातील झालेल्या अतिवृष्टी संदर्भातील व पिकांची सद्यस्थिती जिल्हाधिकार्याना समजावून सांगितली. यापूढेही उरलेल्या पिकांचे नुकसान कसे होणार ही वस्तुस्थिती प्रशासनाच्या लक्षात आणुन दिल्यावर शेतकऱ्यांना मदत मिळेल हा विश्वास आहे.
-राजेश मोरे, शेतकरी
तळणी मडळाची अतिवृष्टीमुळे झालेल्यात आला आहे आणखी दोन तीन मंडळात ६५ मि मी पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे नुकसानीचे प्रस्ताव पाठवण्याचे काम सुरू आहे. कुठलेही मंडळ गाव मदतीपासून वचित राहणार नाही शासनाच्या नियमानुसार मदत केली जाणार आहे
पद्माकर गायकवाड, उपविभागिय अधिकारी परतूर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT