Jalna Crime News pudhari photo
जालना

Jalna Crime : जिल्ह्यात अन्न व औषधी प्रशासनाच्या कारवाया

भेसळयुक्त खाद्यतेल, गुटखा व लेबलदोषयुक्त पेयांचा साठा जप्त

पुढारी वृत्तसेवा

जालना: अन्न व औषध प्रशासन विभागाने 5 मे रोजी जिल्ह्यात अन्नसुरक्षा व ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्टीने विशेष मोहीम राबवत विविध ठिकाणी कारवाई केली. या कारवाईत भेसळयुक्त खाद्यतेल, प्रतिबंधित गुटखा तसेच लेबलदोषयुक्त ऊर्जा पेयांचा सुमारे 3 लाख 95 हजार 599 रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. संबंधितांविरुद्ध पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

अंबड येथील भगवती ट्रेडर्स या आस्थापनावर तपासणी करण्यात आली. यावेळी भेसळयुक्त असल्याचा संशय असलेल्या खाद्यतेलाचा साठा आढळून आला. संबंधित तेलाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून 358 किलो वजनाचा व 57 हजार 280 रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे.

दुसऱ्या कारवाईत अंबड तालुक्यातील शहागड येथील रहिम रहमान शेख याच्या ताब्यातून प्रतिबंधित अन्नपदार्थ गुटख्याचा मोठा साठा आढळून आला. या प्रकरणात गुटखा व वाहन असा 2 लाख 19 हजार 719 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी संबंधित आरोपीविरुद्ध गोंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

तिसऱ्या कारवाईत जालना येथील समर्थ एजन्सी येथे तपासणी दरम्यान इलेक्ट्रोलाइट एनर्जी ड्रिंक या उत्पादनाच्या लेबलमध्ये अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळून आले. त्यामुळे 1 लाख 18 हजार 600 रुपये किमतीचा लेबलदोषयुक्त साठा जप्त करण्यात आला असून संबंधित प्रकरणात नियमानुसार पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.

अन्न व औषध प्रशासनाने नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या अन्नपदार्थांच्या विक्री व वितरणाविरुद्ध कारवाईचा धडाका सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. अन्न औषधी प्रशासनाच्या या कारवाईमुळे खळबळ उडाल्याचे दिसत आहे.

भेसळीची माहिती प्रशासनाला द्या

नागरिकांनी भेसळयुक्त किंवा संशयास्पद अन्नपदार्थ, प्रतिबंधित गुटखा अथवा नियमबाह्य उत्पादनांची माहिती प्रशासनाला द्यावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त (अन्न) नि. सु. कुलकर्णी यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT