Jalna Farmers suffer heavy losses due to heavy rains
सादिक शेख
आन्वा: जून महिन्यात पाऊस कधी पडेल आणि पेरणी कधी पूर्ण होईल, याबाबतची भ्रांत शेतकऱ्यांच्या मनातून दूर झाली होती. पाऊस पडल्यामुळे स्वप्नातील पिके शेतात वास्तवात बहराला लागली होती. शेतकऱ्यांची अशा होती की यंदाची दिवाळी व दसरा उत्साहात साजरे करता येतील, परंतु सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवष्टीने होत्याचे नव्हते झाले असून हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी संकटात सापडला आहेत. ऐन सणासदीच्या काळात दिवाळे निघाल्याने आता दिवाळी कशी साजरी करणार, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.
मध्यतंरी पावसाची अनियमित दडी तरीही योग्य वेळी पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नातील पिकांना बहर आला; मात्र, गणेश बसली ोत्सवाच्या काळात जोरदार पाऊस झाला. पोळ्यानंतर पाऊस कमी होतो. अशी पारंपरिक अपेक्षा गेल्या काही वर्षांत मोडीत निघाली आहे. यंदाही जोरदार पाऊस पडल्याने अनेक शेतांमध्ये पिकांचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी साचले आहे.
अतिवष्टीमळे उत्पादन हातात येण्यापूर्वीच नष्ट झाले असून सरकारने या आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे, नेते येत आहेत, पाहणी करत आहेत. त्यांच्या पाहणीमुळे धीर मिळत असला तरीही उत्सवाच्या तोंडावर मोठ्या आर्थिक मदतीची गरज आहे. सरकारने तत्काळ याबाबत निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.राजेंद्र बावणे, शेतकरी वाकडी
भोकरदन तालुक्यात अनेक भागांत अतिवृष्टीमुळे शेती खरडून निघाली पिके नष्ट झाली. शेतकऱ्यांसमोर प्रश्न उभा आहे की, उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण यांसारख्या जबाबदाऱ्या सांभाळताना पुन्हा नुकसान झाले तर काय उपाय? त्यामुळे शासनाने पंचनाम्याची वाट न पाहता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.अंकुश जाधव, युवक तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट,