जालना ः शहरातील नूतन वसाहत भागात नशेच्या बटन गोळ्यासह एका आरोपीस कदीम जालना पोलिसांनी जेरबंद केले. आरोपीपह पोलिस अधिकारी व कर्मचारी.  (छाया ः शरद खानापुरे)
जालना

Jalna crime : नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या बटन गोळ्यांसह एक जण ताब्यात

कदीम जालना पोलिसांची कारवाई, मोठा साठा जप्त, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

जालना ः शहरातील नुतन वसाहत भागात नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या बटन गोळ्यांची विक्री करणाऱ्या एका इसमाला कदीम जालना पोलिसांनी अटक करून त्याच्याजवळून गोळ्यांचा मोठा साठा जप्त केला आहे. ही कारवाई मंगळवार (28 ) रोजी करण्यात आली.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या जालन्यातील नूतन वसाहत परिसरात एक व्यक्ती बेकायदेशीरपणे नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या बटन गोळ्यांची विक्री करत असल्याची माहिती खबऱ्यामार्फत पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांसह या भागात छापा टाकला.

या कारवाईत जुना जालन्यातील बाबर गल्ली राहणाऱ्या संशयीत सय्यद सलमान सय्यद गफार यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडून बटन गोळयाचे 29 पाकिटे (325 गोळ्या) जप्त करण्यात आल्या. या गोळ्यांमध्ये हा प्रतिबंधित घटक आढळून आला असून तो नशेसाठी वापरला जातो.

सदर इसमाकडे औषध विक्री परवाना किंवा डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन नसल्याचे चौकशीत उघड झाले. त्यामुळे त्याच्याविरुद्ध कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील दुसऱ्या फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिस पथक रवाना करण्यात आले आहे.जालना शहरात यापूर्वीही बटन गोळ्या विक्री करताना काही जणांना पकडण्यात आले आहे.

मध्यंतरी लक्कडकोट परिसरातील एका औषधी दुकानातुनही बटन गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत. नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या या गोळ्या गंभीर स्वरुपाचा गुन्हा करण्यापूर्वी काही गुन्हेगार वापरत असल्याची चर्चाही एैकावयास मिळत आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक अजयकुमार बंसल, अपर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक जे. बी. शेवाळे यांच्यासह कदीम जालना पोलिस ठाण्याच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी केली आहे.

चोरून विक्री सुरू

जालना शहरात नशेच्या बटन गोळ्या खाऊन अनेक गुन्हेगार गुन्हे करीत असल्याची चर्चा आहे. काही वर्षांपूर्वी तात्कालीन आ.कैलाश गोरंट्याल यांनी सभागृहात हा प्रश्न उपस्थित केला होता.त्यानंतरही शहरात चोरून नशेच्या बटन गोळयांची विक्री होत असल्याचे समोर येत असल्याचे दिसत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT