व्याख्यानमालेत बोलताना शमिभा पाटील  pudhari
जालना

Jalna Dr. Ambedkar Vyakhyanmala |''वैचारिकदृष्ट्या संघटित होण्याची गरज''

डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेत शमिभा पाटील यांचे प्रतिपादन

पुढारी वृत्तसेवा

जालना, पुढारी वृत्तसेवा आपल्या देशात क्रांती आणि प्रतिक्रांतीचे मोड ऑन झाले असून लोकशाही व संविधान विरोधकांच्या विरोधात आंबेडकरी अनुयायांनी वैचारिकदृष्ट्या संघटित होण्याची गरज जळगाव येथील पारलिंगी सामाजिक कार्यकर्त्या शमिभा पाटील यांनी केले.

जालना शहरातील स्वामी विवेकानंद हायस्कूलच्या मैदानावर सुरू असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेचे पाचवे पुष्प गुंफताना त्या बोलत होत्या. ज्येष्ठ सामाजिक नेते सुधाकरराव रत्नपारखे हे यावेळी अध्यक्षस्थानी होते. भाजपचे नेते भास्कर दानवे, माजी सभापती सुदामराव सदाशिवे, डी. आर. सावंत, अशोक रगडे, मिलिंद कांबळे आदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. विचारमंचावर डॉ बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेचे अध्यक्ष डॉ शांताराम रायपुरे, सचिव सुधाकर रतनराव रत्नपारखे यांची उपस्थिती होती.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व आपली जबाबदारी या विषयावर विचार मांडताना शमिभा पाटील पुढे म्हणाल्या की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शोषित समाजाला श्वास दिला, त्याला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला. देशातील पितृसत्ताक व्यवस्थेविरुद्ध तसेच शोषणाविरुद्ध लढा देण्याचे विचार पेरले. समता, स्वातंत्र्य, बंधुता हो तत्त्वे दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक समतेसाठी संघर्ष केला, त्यांनी रक्तविहीन क्रांती करून शोषित, वंचित घटकांच्या आयुष्यात प्रकाश पेरला. शासनकर्ती जमात बनण्याचे त्यांचे स्वप्न होते.

आजपर्यंत आपण अनु. जाती जमातीना एकत्र करू शकलो नाही, त्यामुळे घटनेच्या मूळ गाभ्यातील आरक्षणाला संपविण्याचे षडयंत्र सुरू आहे. आंबेडकरी चळवळीचा सामाजिक लढा अनेकांनी पाहिला आहे, देशात निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीविरोधात लढण्यासाठी आंबेडकरी चळवळीची धार बोथट झाली आहे. ७५ वर्षांत आपल्या देशात आंबेडकरी विचारष-रिचा पंतप्रधान झाला नाही, ही खेदाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार केवळ पुस्तकात न ठेवता समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचविणे गरजेचे आहे, सामाजिक परिवर्तनासाठीडॉ डॉ. बाबासाहेब अबेिडकर यांच्या विचारावर आधारित पंचसू त्रीचा आंबेडकर अनुयायांनी अवलंब करावा, सामाजिक परिवर्तनासाठी प्रत्येकाने जबाबदारीने वागावे, असे आवाहनही शमिभा पाटील यांनी यावेळी केले. सूत्रसंचालन डॉ. शशिकांत पाटील यांनी केले तर संजय हेरकर यांनी आभार मानले. यावेळी ज्येष्ठ सामाजिक नेते अॅड. बी. एम. साळवे, अॅड. बह्यानंद चव्हाण, राम गायकवाड, राम साळवे यांच्यासह पुरुष तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT