पिंपळगाव रेणुकाई (जालना) : भोकरदन तालुक्यातील सेलूद येथील धामणा धरणातून परिसरातील बारा गावांना पिण्यासाठी पाणीपुरवठा केला जातो. ऑगस्ट महिन्यात धरणात 21 टक्के जलसाठा आहे. धरण परिसरात मोठ्या पावसाची गरज आहे. यावर्षी या भागात पाणीटंचाईचे सावट दिसून येत आहे.
सेलूद येथील धामणा धरण परिसरात गतवर्षी चांगला पाऊस पडल्याने धामणा धरण ओव्हरफ्लो झाले होते. जून महिन्याच्या दुसर्या आठवड्यात धरणात तब्बल 21 टक्के एवढा जलसाठा असल्याने परिसरातील वडोद तांगडा, जळकी बाजार, आन्वा, जळगाव सपकाळ, वालसांगवी, हिसोडा खुर्द, हिसोडा बुद्रुक, सेलूद, पोखरी, धावडा, खुपटा, लेहा या गावारील पाणी संकट यंदा टळले आहे. दोन वर्षांपूर्वी धामणा धरण कोरडे पडल्याने या बारा गावांमधे भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्याने धरणातून पाणीपुरवठा होणार्या बारा गावातील पाणीप्रश्न गंभीर बनला होता. गेल्या वर्षापासून धरणात पुरेसा पाणी साठा शिल्लक राहत असल्याने बारा गावांतील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागला नाही. धामणा धरणातील पाणी पातळीत गेल्या काही दिवसांपासून झपाट्याने घट होऊ लागल्याने धरण परिसरात मोठे पाऊस न पडल्यास बारा गावांतील पाणीप्रश्न भेडसावणार आहे.
धामणा धरणात सद्या 21 टक्के पाणी साठा उपलब्ध आहे. परिसरात मोठे पाऊस पडले नसल्याने धरणातील पाणीसाठ्यात थोडी वाढ झाली आहे. धरणाच्या परिसरात मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. पावसाळ्यात धरण पोर्टफोल न झाल्यास परिसरातील शेतकर्यांना रब्बी पिकासाठी पाणीटंचाई जाणवणार आहे.रवी पायघन, कालवा निरीक्षक, धामणा धरण, सेलूद