जालना

जालना: शहागडजवळ गोदावरी नदीत मृतदेह आढळला

अविनाश सुतार

शहागड: पुढारी वृत्तसेवा: जालना – बीड सीमेवरील अंबड तालुक्यातील शहागड येथील गोदावरी नदीपात्रात गेवराई हद्दीतील पाण्यात काठाजवळ गोदावरी नदीच्या नवीन पुलाखाली मृतदेह आढळून आला. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. शेतक-यांना पाण्यात फुगून वर आलेला मृतदेह दिसल्याने त्यांनी तत्काळ पोलिसांना कळवले.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहागड, खामगाव दरम्यान असलेल्या गोदावरीच्या पुलाखाली हात पाय साडीने बांधलेला मृतदेह खामगाव येथील शेतकऱ्यांना आढळून आला. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक भुतेकर, उबाळे, हंबर्डे यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी गेवराई उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. घटनास्थळाचा पंचनामा केला.सदरील व्यक्ती तीस वर्षीय असून या अज्ञात व्यक्तीच्या छातीवर वार करुन खून करत हात -पाय बाधून पुलाखाली मृतदेह फेकून दिला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. पुढील तपास गेवराई पोलीस करत आहेत.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT