Jalna Crime News : A farmer ended his life in Kukkadgaon
सुखापूरी पुढारी वृत्तसेवा : अंबड तालुक्यातील कुक्कडगांव येथे 44 वर्षीय शेतकरी ज्ञानेश्वर रामराव गायकवाड यांनी आज सकाळी राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवले.
सकाळी साडेसातच्या सुमारास घरातील पत्र्याच्या शेडमध्ये लोखंडी अँगलला वायरने गळफास घेतल्याचे आढळले. वडील रामराव गायकवाड यांनी हा प्रकार पाहताच आरडाओरड केल्याने ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.
घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. दुपारी तीन वाजता गावातील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट नसून कर्जबाजारीपणामुळे हे पाऊल उचलल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.पुढील तपास अंबड पोलीस करत आहेत.