जालना ः जालना जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या 27 अवैध धंद्यावर कारवाया करून पोलिसांनी 54 लाख 30 हजार 302 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
जालना शहरामध्ये अवैध धंद्यावर कारवाई करणेबाबत पोलिस अधीक्षक तेघबीर सिंह संधू यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पंकज जाधव यांना सूचना दिल्या होत्या. त्यानुषंगाने पोलिस निरीक्षक पंकज जाधव यांनी पोलिस अधिकारी व अंमलदार यांचे पथक तयार करून कारवाई करणेबाबत मागदर्शन करुन सूचना दिल्या. त्यानुषंगाने 6 ते 11 मे दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जिल्ह्यातील वेगवेगळया पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंद्यावर कारवाई केली.
यात जुगार खेळणाऱ्या व खेळविणाऱ्या इसमांवर-12 कारवाया करून 9 लाख 51 हजार 90 रुपये, अवैध दारू वाहतूक व विक्री करणाऱ्या इसमांवर 11 कारवाया करून 4 लाख 03 हजार 520 रुपय, प्रतिबंधीत गुटखा विक्री करणाऱ्या एका जणांवर कारवाई करुन 24 हजार 292 रुपये , अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या इसमाविरुध्द कारवाई करून 15 लाख 25 लाख रुपये तसेच 51 लाख 328 किलो वजनाच्या लोखंडी सळ्या जप्त करण्यात आल्या.