jalna congress party Sangathan Srijan Abhiyan
जालना, पुढारी वृत्तसेवाः जालना शहरातील आयएमए हॉल येथे रविवारी आयोजित काँग्रेसच्या संगठण सृजन अभियान बैठकीत काँग्रेस पक्षातुन निलंबीत करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांनी भारतीय काँग्रेस पार्टीचे गुजरातचे माजी खा. हेमंत सिन्हा, खा. कल्याण काळे यांच्या समोर जिल्हाध्यक्षांना कारवाईबाबत जाब विचारल्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
जालना महापालीका निवडणुकीत स्विकृत सदस्य निवडीवरुन झालेल्या वादात काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजाभाठ देशमुख यांनी महापालीकेतील गटनेते तुंडीवाले यांच्यासह काँग्रेस नक्षरसेवकांसह महिला जिल्हाध्यक्षांवर निलंबनाची कारवाई केली होती. यामुळे काँग्रेस पक्षातुन निलंबीत करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांमधे प्रचंड रोष होता.
या पार्श्वभुमीवर रविवारी काँग्रेसच्यावतीने आयएमए हॉल येथे आयोजित काँग्रेसच्या संगठण सृजन अभियान बैठकीत निलंबन झालेल्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भुमीका घेत जिल्हाध्यक्ष पक्षाच्या वरिष्ट नेत्यांना जाब विचारला. यावेळी राजाभाऊ देशमुख यांच्यावर निलंबन झालेल्या पदाधिकाऱ्यांचा रोष प्रकट झाला. निलंबन झालेल्या पदाधिकाऱ्यांनी थेट व्यासपिठावर चढुन कारवाई बाबत जाब विचारला. यामुळे गोंधळ उडाला.
बूट उगारल्याचा आरोप
9 यावेळी झालेल्या गदारोळात जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी बुट उगारल्याचा आरोप करण्यात आला आहे. भारतीय काँग्रेस पार्टीचे गुजरातचे माजी खा. हेमंत सिन्हा यांना माईक हातात घेउन निलंबन करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना समजावे लागले.