शोकसभेत चंद्रकांत दानवे यांना अश्रू अनावर file photo
जालना

शोकसभेत चंद्रकांत दानवे यांना अश्रू अनावर

थील माजी आमदार चंद्रकांत पुंडलिकराव दानवे यांच्या संपर्क कार्यालयात उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या निधनानंतर शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते.

पुढारी वृत्तसेवा

jalna Chandrakant Danve was overcome with emotion and broke down in tears at the condolence meeting

भोकरदन, पुढारी वृत्तसेवा येथील माजी आमदार चंद्रकांत पुंडलिकराव दानवे यांच्या संपर्क कार्यालयात उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या निधनानंतर शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी आ. चंद्रकांत दानवे यांना अश्रू अनावर झाल्याचे दिसून आले.

या कार्यक्रमास महाविकास आघाडी व विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी पुष्पहार अर्पण करून दोन मिनिटांचे मौन पाळत तीव्र शोक व्यक्त केला. तसेच स्व. अजितदादा पवार यांच्या सामाजिक, राजकीय व सार्वजनिक जीवनातील कार्याचा शांत व भावनिक वातावरणात गौरव करण्यात आला.

यावेळी माजी आ. चंद्रकांत पुंडलिकराव दानवे, रमेश सपकाळ, युवानेते सुधाकर दानवे, त्र्यंबक पाबळे, सुरेश सपाटे, शफिक शेठ पठाण, मदनराव तुपे, शमीम मिर्झा, बोरसे गुरुजी, कैलास पुंगळे, पंढरिनाथ पवार, श्रावणकुमार आक्से, संग्रामराजे देशमुख, गंगाधर कांबळे, नसिम पठाण, रिजवान शेख, शब्बीर कुरेशी, जहीर कुरेशी इ. पदाधिकाऱ्यांनी आपले श्रद्धांजलीपर शोक व्यक्त करत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित केली. यावेळी शहरासह तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT