Jalna Crime News pudhari photo
जालना

Jalna Crime : गर्दीचा फायदा घेत महिलेचे १८ हजारांचे मंगळसूत्र लंपास

जालना बस स्थानकातील प्रकार; प्रवाशांत असुरक्षितता

पुढारी वृत्तसेवा

भोकरदन : जालना बस स्थानकात गर्दीचा फायदा घेत एका अज्ञात चोरट्याने महिलेच्या गळ्यातील १८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मणी मंगळसूत्र चोरून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबात पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शोभा लिंबाजी लिखे (वय ६५, रा. विरेगाव, ता. जि. जालना) या ९ जुलै रोजी दुपारी २:३० च्या सुमारास जालना बस स्थानकावरून छत्रपती संभाजीनगर ते परभणी या बसमध्ये चढत होत्या.

बसमध्ये चढताना त्यांचा चष्मा अचानक खाली पडला, तो घेण्यासाठी त्या खाली वाकल्या असता त्यांना गळ्यातील मणी मंगळसूत्राचे मणी खाली पडल्याचे दिसून आले. त्यांनी तत्काळ गळ्याला हात लावून खात्री केली असता, चोरट्याने गर्दीचा फायदा घेऊन त्यांचे १८ हजार रुपये किमतीचे ४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी मंगळसूत्र लंपास केल्याचे निष्पन्न झाले.

पोलिसांचा तपास सुरू

या घटनेनंतर शोभा लिखे यांनी सदर बाजार पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली.या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३०३(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस हवालदार चंद्रशेखर मांटे करत आहेत. बस स्थानकासारख्या वर्दळीच्या ठिकाणी दिवसाढवळ्या घडलेल्या या चोरीच्या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

पोलिस चौकी असून अडचण...

सदर बाजार पोलिस ठाण्यांतर्गत जालना बसस्‍थानकात पोलिस चौकी आहे. मात्र, येथे पोलिस कर्मचारी उपस्‍थित राहत नसल्यामुळे चोरट्यांची मजल वाढत आहे. यामुळे बसस्‍थानक परिसरात सोन्याचे गंठण हिसकावण्याचे प्रकार वाढले आहे. सदर बाजार पोलिसांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT