जालनाः दीपक रणनवरे यांना ज्यूस देताना एसडीएम रामदास दौंड. यावेळी समाजबांधवांची उपस्‍थिती होती.  (छायाः किरण खानापुरे)
जालना

Jalna Brahmin community protest : ब्राह्मण समाजाचे दीपक रणनवरे यांचे सहाव्या दिवशी आमरण उपोषण मागे

भाजप प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी यांच्या मध्यस्थीला यश; मुख्यमंत्र्यांशी लवकरच बैठक

पुढारी वृत्तसेवा

जालना: ब्राह्मण समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी गेल्या पाच दिवसांपासून जालना शहरातील गांधी चमन येथे आमरण उपोषणाला बसलेले समाजनेते दीपक रणनवरे यांनी अखेर आपले उपोषण मागे घेतले. भाजपचे प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी उपोषणस्थळी प्रत्यक्ष भेट देऊन शासन आणि आंदोलक यांच्यात समन्वय साधल्याने या अन्नत्याग आंदोलन मागे घेण्यात आले.

यावेळी अंबाजोगाई पेशवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी प्रा. राहुल कुलकर्णी, डॉ महेश अकोलकर, योगेश जानतीकर, संजय देशपांडे, मधुसूदन दंडारे, आर. आर. जोशी, अरविंद देशपांडे, दिलीप जोशी, ॲड. बळवंत नाईक, भूषण जोशी, राहुल यादनिक, अनिल दीक्षित, सिध्दिविनायक मुळे उपस्‍थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT