जालना ः भोकरदन तालुक्यातील राजूर येथील आठवडे बाजारातून दुचाकी चोरणाऱ्या संशयित आरोपीस पोलिसांनी जेरबंद केल्यांनतर आरोपीसह पोलिस अधिकारी व कर्मचारी.  pudhari photo
जालना

Jalna bike theft case : आठवडे बाजारातून दुचाकी चोरणारा जेरबंद

हसनाबाद पोलिसांची राजूर येथे कारवाई

पुढारी वृत्तसेवा

जालना ः भोकरदन तालुक्यातील हसनाबाद पोलिसांनी राजूर येथील आठवडे बाजारातून मोटारसायकल चोरी करणाऱ्या एका आरोपीस जेरबंद करून त्याच्या ताब्यातून चोरीस गेलेली 35 हजार रुपये किमतीची दुचाकी जप्त केली आहे.

बदनापूर तालुक्यातील चिखली येथील दशरथ सेनाजी वाळुंडे हे 19 एप्रिल रोजी राजूर येथे आठवडे बाजारासाठी आले असता त्यांची दुचाकी (क्रमांक -21 -5321) ते बाजार परिसरात उभी करून खरेदीसाठी गेले होते. सुमारे 11.30 वाजता परत आल्यानंतर त्यांना दुचाकी जागेवर दिसून आली नाही. परिसरात शोध घेऊनही वाहन न सापडल्याने त्यांनी हसनाबाद पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

तपासा दरम्यान सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे देऊळगाव राजा येथील संशयित परशुराम प्रभाकर वरपे यास पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून चोरीस गेलेली दुचाकी जप्त करण्यात आली असून, त्याने यापूर्वी आणखी गुन्हे केले आहेत का याबाबत पुढील तपास सुरू आहे.आरोपीकडुन इतर गुन्हे उघउ शक्यता आहे.

यांनी केली कारवाई

ही कारवाई पोलिस अधीक्षक अजयकुमार बंसल, अपर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी व उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन कटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली हसनाबाद पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी योगेश उबाळे, पोलिस उपनिरीक्षक अर्चना भोसले व त्यांच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT