विधानसभा आचारसंहिता, उमेदवार कार्यकर्त्यांवर निर्बंधांचा अंकुश file photo
जालना

Assembly Election : विधानसभा आचारसंहिता, उमेदवार कार्यकर्त्यांवर निर्बंधांचा अंकुश

पुढारी वृत्तसेवा

जालना, पुढारी वृत्तसेवाः जिल्हयातील पाच विधानसभा निवडणुकीचे मतदान २० नोव्हेंबर रोजी तर मतमोजणी २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणुकीसाठी उमेदवार व कार्यकर्त्यांवर निर्बंधांचा अंकुश राहणार आहे.

निवडणुकीच्या प्रचारासाठी ध्वनिक्षेपकासह खासगी व सार्वजनिक जागेवर झेंडे, भित्तिपत्रके लावण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी दहापेक्षा अधिक मोटार गाड्या, वाहनांच्या ताफ्याचा वापर करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. जालना जिल्ह्यातील जालना, परतूर, घनसावंगी, भोकरदन व बदनापूर या पाच विधानसभा मतदारसंघांत २९ ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. उमेदवारी अर्जाची छाननी ३० ऑक्टोबर रोजी होणार आहे. उमेदवारी अर्ज परत घेण्याचा अंतिम दिनांक ४ नोव्हेबर आहे.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी ध्वनिक्षेपकाचा वापर पोलिस अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय करता येणार नाही. सकाळी ६ वाजेपूर्वी आणि रात्री १० वाजेनंतर कोणत्याही फिरत्या वाहनावर व कोणत्याही क्षेत्रात ध्वनिक्षेपकाचा वापर करता येणार नाही. दिवसा प्रचाराकरिता फिरणाऱ्या वाहनांनी ध्वनिक्षेपकाचा वापर विशिष्ट ठिकाणी थांबूनच करावा लागणार आहे. ध्वनिक्षेपकाच्या आवाजासह फिरणाऱ्या वाहनास प्रतिबंध करण्यात आला आहे. निश्चित ठिकाणी ध्वनिक्षेपकाच्या वापरा संबंधित घेतलेल्या परवानगीची माहिती जिल्हादंडाधिकारी, संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी व संबंधित यंत्रणेस कळविणे बंधनकारक राहणार आहे.

निवडणकीच्या प्रचारासाठी झेंड्याच्या काठ्या उभारणे, कापडी निवडणुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांच्या ताफ्यामध्ये दहापेक्षा अधिक मोटारगाडया अथवा वाहने वापरण्यास निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत निर्बंध घालण्यात आले आहेत. फलक लावणे, भित्तिपत्रक लावणे, घोषणा लिहिण्याकरिता जागा, इमारत, आबार, भिंतीच्या मालकाच्या परवानगीशिवाय व संबंधित परवाना प्राधिकरणाचे परवानगीशिवाय वापर करण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत.

अधिकृत परवानगी आवश्यक

प्रचारासाठी व्वापरल्या जाणाऱ्या फिरत्या वाहनांवर पक्ष प्रचाराचा झेंडा हा वाहनाच्या डाव्या बाजूला विंड स्क्रिन ग्लासच्यापुढे राहणार नाही आणि तो त्या वाहनाच्या टपापासून २ फूट उंची पेक्षा जास्त राहणार नाही. प्रचाराच्या फिरत्या वाहनावर कापडी फलक वाहन चालकाच्या आसनामागे बाहनाच्या डाव्या व उजव्या बाजूने लावण्यात यावा, इतर कोणत्याही बाजूस तो लावता येणार नाही. फिरत्या वाहनांवर लावाव्याचा पक्ष प्रचाराचा झेंडा किंवा कापडी फलक संबंधित पक्षाचे जिल्हाध्यक्ष, उमेदवार व उमेदवाराचे निवडणूक प्रतिनिधी निवडणूक प्रचारासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून अधिकृत परवानगी घेतलेल्या वाहनांव्यतिरिक्त इतर कोणत्याही वाहनांवर लावता येणार नाहीत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT