जालना : जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत 20 एप्रिल रोजी झालेल्या लिलावात विविध शेतीमालाच्या दरात चढ-उतार दिसून आले. विशेषतः सोयाबीनला कमाल 5600 रुपये तर सरासरी 5400 रुपये दर मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. दिवसभरात एकूण 14 हजार 117 क्विंटल शेतीमालाची आवक झाली असून, सुमारे 5 कोटी 10 लाख रुपयांचे व्यवहार झाले.
गव्हाची 3843 क्विंटल आवक झाली असून त्याला 2000 ते 2600 रुपये दर मिळाला, तर सरासरी दर 2300 रुपये राहिला. ज्वारीला 2200 ते 4400 रुपये दर मिळत सरासरी 3600 रुपये भाव मिळाला. बाजरीचा सरासरी दर 2300 रुपये नोंदविण्यात आला.
तूर (पांढरी) या पिकाला 6500 ते 7550 रुपये दर मिळत सरासरी 7400 रुपये दर कायम राहिला, तर हरभऱ्याला 4900 ते 5400 रुपये दर मिळून सरासरी 5300 रुपये भाव मिळाला. सोयाबीनने सर्वाधिक लक्ष वेधून घेत 5400 रुपयांचा सरासरी दर गाठला. याशिवाय मका 1200 ते 1800 रुपये, गुळ 4026 ते 4255 रुपये, तर सूर्यफूल 6000 रुपये दराने विकले गेले. विशेष बाब म्हणजे रेशीम कोषाला तब्बल 50 हजार ते 59 हजार दर मिळून सरासरी 56 हजार रुपयांवर व्यवहार झाला.