

Soybean fetches a rate of 5,350, while gram commands 5,100
जालना, पुढारी वृत्तसेवा : कृषी उत्पन्न बाजार समिती जालना येथे सोमवार (दि. २३) रोजी विविध शेतीमालाची एकूण १९ हजार १३५ क्विंटल इतकी मोठी आवक नोंदविण्यात आली. बाजारात प्रमुख पिकांना समाधानकारक दर मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
तूर (पांढरी) या पिकाला कमाल ८ हजार तर सर्वसाधारण ७ हजार ७०० रुपये दर मिळाला. तूर (लाल) ७हजार ६०० पर्यंत पोहोचली. हरभरा (गावरान) ५ हजार १०० तर काबुली हरभरा ६ हजार ६०० रुपयांपर्यंत व्यवहारात राहिला. सोयाबीन (पिवळा) ५ हजार ३५० रुपयांपर्यंत गेला.
गहू २ हजार २५०, ज्वारी ३ हजार ७००, बाजरी २ हजार ४०० तर मका १ हजार ६०० रुपयांपर्यंत विक्रीत राहिला. कापूस ७ हजार ६०० रुपये स्थिर राहिला. गुळ (पिवळा) ४ हजार १४० तर गुळ (लाल) ३ हजार ६७५ दराने विकला गेला.
रेशीम कोषाला तब्बल ५७ हजार रुपयांचा उच्चांक दर मिळाला. एकूण व्यवहार मूल्य ७कोटी ७२ लाख ५६ हजार २५० रुपये इतके नोंदविण्यात आले. बाजारात आवक वाढली असली तरी प्रमुख पिकांना चांगला दर मिळत असल्याने आगामी काळातही तेजी कायम राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.