जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे शुक्रवार, (दि. २७) रोजी विविध शेतमालाची एकूण ७,५४० क्विंटल आवक नोंदवली गेली असून, संपूर्ण व्यवहारातून तब्बल ४ कोटी ८१ लाख २१ हजार ३६४ रुपयांची उलाढाल झाली आहे. सोयाबीनची मोठ्या प्रमाणात आवक झाली असून, तूर आणि रेशीम कोषच्या दरांनी शेतकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
आजच्या बाजारभावात पांढऱ्या तुरीला कमाल १०,३०१ रुपये प्रति क्विंटल दर मिळाला, तर किमान दर ९,२०० रुपये आणि सर्वसाधारण दर ९,७६१ रुपये राहिला. चमकी मुगाला कमाल ८,८७५ रुपये दर मिळून आवक २० क्विंटल नोंदवली गेली. सोयाबीनची (पिवळा) सर्वाधिक ४,९६१ क्विंटल आवक झाली असून, त्यास कमाल ७,६०० रुपये, किमान ६,४०० रुपये आणि सर्वसाधारण ७,४५० रुपये दर मिळाला.
शाळू ज्वारीची ५९३ क्विंटल आवक होऊन कमाल ७,००० रुपये दर मिळाला, तर किमान दर २,७२५ रुपये आणि सर्वसाधारण दर ५,१०० रुपये राहिला.गावरान हरभऱ्याला कमाल ७,५०० रुपये, काळ्या उडदाला कमाल ७,००० रुपये, तर सूर्यफुलाला कमाल ६,६५० रुपये दर मिळाला.
गहू (४९६) ची ३८५ क्विंटल आवक होऊन कमाल दर ३,५९९ रुपये, हिरव्या बाजरीची ३७१ क्विंटल आवक होऊन तूर कमाल दर ३,४९० रुपये, लाल मक्याची ६०५ क्विंटल आवक होऊन कमाल दर ३,०७५ रुपये, तर पिवळ्या गुळाची २११ क्विंटल आवक होऊन कमाल दर ५,६४८ रुपये राहिला. दरम्यान, पांढऱ्या रेशीम कोषच्या १ क्विंटल आवकेला ४०,५०० रुपये दर मिळाला.
पिवळ्या गुळाला मिळाला ५हजार ६४८ रुपये भाव
जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत पिवळ्या गुळाची सुमारे २११ क्विंटल इतकी आवक झाली. शुक्रवारी पिवळ्या गुलाला सुमारे ५ हजार ६४८ रुपये इतका भाव मिळाला. तर लाल मक्याची ६०५ क्विंटल आवक होऊन कमाल दर ३,०७५ रुपये इतका राहिला.
जालना कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक परमेश्वर वरखडे आणि सचिव भरत तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली बाजार समितीचा दैनंदिन आढावा जाहीर करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी समाधान मानले.