Jalna accident 
जालना

Jalna accident: जालन्याच्या वडीगोद्री येथे पैठणच्या डाव्या कालव्यात मालवाहू ट्रक कोसळला...

सुदैवाने घटनेत कोणतीही जीवितहानी नाही; घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी...

पुढारी वृत्तसेवा

अकबर शेख

शहागड : अबंड तालुक्यातील वडीगोद्री येथे पैठणच्या डाव्या कालव्यात 14 च्या शुक्रवारी (दि.14) सकाळी आठ वाजता सुमारास मालवाहू ट्रक कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली आहे.

चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा ट्रक कालव्यात कोसळल्याची माहिती समोर आली आहे. जालना-बीड रोडवरील वडीगोद्री येथील पैठणच्या डाव्या कालव्यावरील पुलावर हा अपघात झाला आहे. पुलावरील कठडे तोडून मालवाहू ट्रक थेट कालव्यात कोसळल्याची माहिती आहे. ट्रकमधील चालक आणि क्लिनर यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

दरम्यान, घटना घडल्यानंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली असून परिसरात काही काळ खळबळ उडालेली होती. जायकवाडीच्या डाव्या कालव्यात पुलाचे कोठडे तोडून मालवाहतूक करणे ट्रक पाण्यात कोसळला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT